SSC HSC Exam: औरंगाबाद विभागात दहावीसाठी ६२९ परीक्षा केंद्र असून ६३ परिरक्षक केंद्र आहेत. बारावीसाठी ४३० परीक्षा केंद्र व ५८ परिरक्षक केंद्र आहेत. परिरक्षक केंद्रांना आठ ते दहा शाळा जोडलेल्या असतात. परिरक्षक कार्यालयातून प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहचविण्यासाठी परिरक्षक केंद्र व परीक्षा केंद्र यांच्यातील अंतर पाहूण निश्चित कालावधी देण्यात आलेला असतो. साधारत: तीस मिनिटे किंवा तासभर आधी सहाय्यक परिरक्षक प्रश्नपत्रिका घेऊन निघतो. नव्या बदलामुळे सहाय्यक परिरक्षकावरील जबाबदारी वाढली आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-hsc-exam-question-paper-on-gps-tracking-system/articleshow/97935793.cms
0 टिप्पण्या