TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

मेकअप करायला गेली बया, पण घडलं भलतंच काहीतरी; थेट रुग्णालयात भरती, लग्नही मोडलं

<a href="https://ift.tt/VQH1JGY Face Swollen After Makeup : आपल्या लग्नात आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येक नवरा आणि नवरीची इच्छा असते. यासाठी तरुण-तरुणी मेकअपसाठी (Makeup) हजारो रुपयेही खर्च करतात. ब्रायडल मेकअपसाठी (Bridal Makeup) ब्युटी पार्लर आणि ब्युटीशियन हजारो रुपये घेतात. तरुणींची मेकअपच्या बाबतीत खास अपेक्षा असतात. हीच अपेक्षा एका तरुणीला महागात पडली आहे. एका तरुणीला लग्नासाठी मेकअप करणं चांगलंच महागात पडलं आहे. मेकअपमुळे तरुणीची तब्येत एवढी बिघडली की, तिला थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं.

मेकअपमुळे तरुणी रुग्णालयात दाखल

IANS च्या रिपोर्टनुसार, कर्नाटकातील एका तरुणीला मेकअप केल्यामुळे थेट रुग्णालय गाठावं लागलं आहे. मेकअप केल्यानंतर मुलीचा चेहरा इतका बिघडला की तिला अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करावं लागलं. इतकंच नाही तर यामुळे तिचं लग्नही पुढे ढकलण्यात आलं. हे प्रकरण समोर आल्यानंतर तरुणीचा मेकअप करणाऱ्या ब्युटीशियनला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे ज्या ब्युटी पार्लरमधून पीडित तरुणीने मेकअप करुन घेतला ते हर्बल ब्युटी पार्लर होतं.

चेहरा काळवंडला आणि सुजला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी जाजूर गावची रहिवासी आहे. पीडितेने 10 दिवसांपूर्वी शहरातील गंगाश्री हर्बल ब्युटी पार्लर अँड स्पामध्ये मेकअप ट्रीटमेंट करुन घेतली होती. मेकअप केल्यानंतर पीडितेचा चेहरा काळा पडला आणि चेहऱ्यावर सूज आली. त्यानंतर पीडितेचा चेहरा इतका सुजला की तिला रुग्णालयात ICU मध्ये दाखल करावं लागलं. कर्नाटकातील अर्सिकेरे शहरात शुक्रवारी (3 मार्च) ही घटना उघडकीस आली.

नवीन मेकअप प्रॉडक्ट्सचा वापर

ब्युटीशियन गंगा यांनी पीडितेला सांगितलं होतं की, तिने नवरीच्या चेहऱ्यावर नवीन प्रकारचे मेकअप प्रॉडक्ट्स लावले होते. पण मेकअप ट्रीटमेंट केल्यानंतर पीडितेला अॅलर्जी झाली आणि तिचा चेहरा इतका खराब झाला की तिचे लग्न पुढे ढकलण्यात आलं. सध्या याप्रकरणी अर्सिकेरे शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. पोलिसांनी आरोपी ब्युटीशियनलाही समन्स पाठवलं आहे.

नवरी आयसीयूमध्ये दाखल

दरम्यान, इंडिया टुडेच्या बातमीनुसार, या घटनेनंतर वर पक्षाने हे लग्न मोडलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नवरीला सुंदर दिसण्यासाठी काहीतरी नवीन करुन बघायचं होतं. यामुळे ती ब्युटी पार्लरमध्ये गेली. ब्युटीशियनने नवरीच्या चेहऱ्यावर आधी फाऊंडेशन लावलं. त्यानंतर नवरीने स्टीमही घेतली. यामुळे नवरीच्या चेहऱ्यावर रिअॅक्शन झाली. तिचा चेहऱ्या भाजल्याप्रमाणे काळवंडला आणि सुजला. तिची प्रकृती फार खरा झाल्याने तिला ICU मध्ये दाखल करावं लागलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/56uPGjn Crime : धक्कादायक! लग्नासाठी हट्ट धरला म्हणून प्रियकराची प्रेयसीला बेदम मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: मेकअप करायला गेली बया, पण घडलं भलतंच काहीतरी; थेट रुग्णालयात भरती, लग्नही मोडलंhttps://ift.tt/er9C7Ol

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या