Summer Health Tips : उन्हाळा हळूहळू वाढत चालला आहे. उन्हाळ्यात अनेक प्रकारचे आजार जडतात. जसे की, ताप, सर्दी, खोकला इ. यामध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. सतत हायड्रेटेड राहावं लागतं. अशा परिस्थितीत, उन्हाळ्यात तुम्ही त्वचेची आणि तुमच्या आरोग्याची कशी काळजी घेऊ शकता. यासाठी आम्ही काही टिप्स सांगणार आहोत.

उन्हाळ्यात 'या' टिप्स फॉलो करा

नेहमी नाश्ता केल्यानंतर बाहेर जा : जेव्हाही तुम्ही सकाळी कामानिमित्त घरातून बाहेर पडता तेव्हा नाश्ता केल्यानंतरच बाहेर पडा. यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. सकाळी चहा आणि कॉफीऐवजी ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता. याशिवाय फळेही खाऊ शकतात.

पाण्याचे सेवन करत राहा : सूर्यप्रकाशामुळे उन्हाळ्यात अनेकदा डिहायड्रेशनची समस्या जाणवते. अशा वेळी हे टाळण्यासाठी दररोज थोड्या-थोड्या वेळाने पाण्याचे सेवन करत राहा. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या होणे अशा समस्या होऊ शकतात. उन्हाळ्यात 2 ते 3 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. याबरोबरच तुम्ही कलिंगडाचा ज्यूस, नारळ पाणी देखील पिऊ शकता.

ज्यूसचे सेवन करा : उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी थंड पाण्याऐवजी ताज्या रसाचे सेवन करा. जसे की, संत्र्याचा रस, कलिंगडाचा रस पिऊ शकता. यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होईल.

मसालेदार अन्नापासून दूर राहा : मसालेदार अन्नापासून नेहमी दूर राहा. कारण त्याचा प्रभाव उष्ण असतो आणि उन्हाळ्यात तुमचे शरीर खूप गरम झाले तर अनेक समस्या उद्भवू शकतात. यामध्ये मुरुम, उलट्या आणि बिघडती पचनसंस्था यांचा समावेश होतो.

थंड पाण्याचं सेवन टाळा : बरेच लोक जास्त गरम झाल्यावर थंडगार पाण्यात बर्फ घालून पाणी पितात. हे टाळा. त्याऐवजी तुम्ही फ्रेश ज्यूस पिऊ शकता.

बाहेरून आल्यानंतर लगेच आंघोळ करणे टाळा : जर तुम्ही उन्हाळ्यात बाहेरून आला असाल तर लगेच आंघोळ करू नका. बाहेरून आल्यानंतर शरीराचे तापमान खूप जास्त असते, अशा स्थितीत शरीरावर पाणी पडल्याने शरीराचे तापमान बिघडते. यामुळे सर्दी, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/71KU4CA Tips : पोटाची चरबीही कमी होईल आणि पचनक्रियाही नीट राहील; सकाळी उठल्याबरोबर ही 3 आसनं करा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : उन्हाळ्यात निरोगी आणि फ्रेश राहण्यासाठी फॉलो करा या 5 टिप्स; दिवसभर उत्साही राहालhttps://ift.tt/gdWSoxI
0 टिप्पण्या