Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २५ मार्च, २०२३, मार्च २५, २०२३ WIB
Last Updated 2023-03-25T05:28:38Z
my zone

Karnataka Assembly Election : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी यांची घोषणा

Advertisement
Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल 124 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दिग्गज नेते डीके शिवकुमार यांच्या नावांला पसंती देण्यात आली आहे. कर्नाटक राज्यात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. कर्नाटकात सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र यावेळी कल काँग्रेसच्या बाजुने दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. काँग्रेसला पुन्हा एकदा कर्नाटक सरकारमध्ये  स्थापन करण्यात यश येईल, असा दावा या पक्षाकडून करण्यात आला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, त्यांच्याकडे बहुमत नव्हते. त्यानंतर राज्यात काँग्रेस आणि जेडीएस आघाडीने सरकार स्थापन केले. मात्र, हे युतीचे सरकार 5 वर्षे टिकू शकले नाही आणि भाजप पुन्हा सत्तेत आले.

from Zee24 Taas: India News https://ift.tt/dkB5cGo
via Source