Summer Health Tips : उन्हाळ्यात फळं आणि ज्यूसचं सर्वाधिक सेवन केलं जातं. फ्रीजमध्ये फळं ठेवल्यास ती अनेक फळे सुकतात किंवा कुजतात. त्यामुळे ती फेकून द्यावी लागतात. आपण अनेकदा ताजी फळं आणि भाज्या मोठ्या प्रमाणात खरेदी करतो. पण, असे केल्याने ताजी फळं सामान्यपेक्षा वेगाने सडण्याची शक्यता वाढते. या ठिकाणी ताजी फळं खराब होण्यापासून थांबविण्यासाठी आम्ही काही स्मार्ट हॅक सांगणार आहोत. असे केल्याने फळांची शेल्फ लाईफ देखील वाढेल.

लिंबूवर्गीय फळे

इतर फळांच्या तुलनेत लिंबूवर्गीय फळांचे शेल्फ लाईफ चांगले असते, त्यांना थंड आणि कोरड्या जागी उघडे ठेवणे चांगले आहे. त्यांना फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील पाण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी होऊ शकते. मात्र, एक महिन्यापर्यंत ताजेपणा राखण्यास मदत होते.

केळी

साधारणत: इतर फळांच्या तुलनेत केळी लवकर पिकतात. त्यामुळे ती लगेच सडतात. केळी जास्तीत जास्त 4-5 दिवस चांगली राहतात. आणि त्यानंतर ती सडण्यास सुरुवात होते. अशा वेळी केळ्यांचे शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी, केळीचे घड झाकून ठेवा आणि फ्रीजमध्ये कोरड्या जागी ठेवा, यामुळे केळीचे शेल्फ लाईफ वाढेल. जर तुम्हाला केळी लगेच खायची नसतील तर तुम्ही कच्ची हिरवी केळी पण विकत घेऊ शकता.

टरबूज

टरबूज कापल्यानंतर त्याचा ताजेपणा टिकवून ठेवणं फार कठीण काम आहे. पण, तुम्ही जर योग्य पद्धतीने टरबूज कापलं तर ती साधारण 4 ते 7 दिवस टिकतात. टरबूजाचा एक भाग कापल्यानंतर, उरलेले टरबूज झाकून ठेवा आणि हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा, शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये ठेवा.

सफरचंद

सफरचंद तुम्ही कसे जपून ठेवता यावर त्याची शेल्फ लाईफ अवलंबून आहे. सफरचंद जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी डाग नसलेले सफरचंद निवडा आणि त्याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. यामुळे केवळ ताजेपणा टिकवून ठेवण्यास मदत होणार नाही तर शेल्फ लाईफ 15 दिवसांपर्यंत वाढेल.

अननस

कापलेले अननस सामान्य रूमच्या तपमानावर ठेवल्यास त्याची शेल्फ लाईफ कमी होऊ शकते आणि 3 दिवसांत त्याची चव आणि पोत नष्ट होऊ शकते. पण जर तुम्हाला अननसाचा फ्रेशनेस आणि गोड पोत टिकवून ठेवायचा असेल तर चिरलेला अननस हवाबंद डब्यात ठेवा आणि डीप फ्रीजरमध्ये ठेवा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/GnPSztx Tips : पोटाची चरबीही कमी होईल आणि पचनक्रियाही नीट राहील; सकाळी उठल्याबरोबर ही 3 आसनं करा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Summer Health Tips : फळं लगेच खराब होतात? 'या' स्मार्ट पद्धती फॉलो करा, फळांचं शेल्फ लाईफ वाढेलhttps://ift.tt/K1ZTQEi
0 टिप्पण्या