
इस्रोमध्ये 63 पदांची भरती केली जाणार आहे. यात टेक्निशयनसाठी 30, टेक्निशियन असिस्टेंटसाठी 24 आणि अन्य पदांसाठी 9 जणांची भरती केली जाणार आहे.
पात्रता
टेक्निशियन पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी पास आणि फिटर ट्रेडमध्ये आयटीआय पास असणं गरजेचं आहे. टेक्निकल असिस्टेंट पदासाठी मॅकेनिकल इंजिनिअर किंवा प्रोडक्शनमध्ये डिप्लोमाधारक असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवारीचं वय 35 वर्षे असावं.
नोकरीसाठी अर्ज असा कराल
- इस्रोच्या अधिकृत वेबसाईट iprc.gov.in/iprc वर जा.
- करिअर पेजवर क्लिक करा
- एक नवीन पेज तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल
- सर्व आवश्यक डिटेल्स चेक करा आणि अप्लाय बटणावर क्लिक करा.
- आता तुम्ही अॅप्लिकेशन फॉर्म लिंकवर जाल
- तुमच्या आवडत्या पोस्टसाठी अर्ज करा.
- अॅप्लिकेशन फॉर्म फिल करा आणि डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- शेवटी अॅप्लिकेशन फी भरून फॉर्म सबमिट करा.
अर्ज भरण्याची फी किती ?
- टेक्निकल असिस्टेंट : 750 रुपये
- टेक्निशियन बी ड्राट्समॅन फायरमॅन लाइट व्हेइकल ड्रायव्हर हेवी व्हेइकल ड्रायव्हर : 500 रुपये
ही फी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.या व्यतिरिक्त क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून भरू शकता.
किती पगार मिळणार ?
- टेक्निकल असिस्टेंट : 44,900 रुपयांपासून 1,49,400 रुपयांपर्यंत
- टेक्निशियन ‘बी’ ड्राट्समॅन : 21,700 रुपयांपासून 69,100 रुपयांपर्यंत
- फायरमॅन/हेवी व्हेइकल ड्रायव्हर/लाइट व्हेइकल ड्रायव्हर : 19,900 रुपयांपासून 63,200 रुपयांपर्यंत
उमेदवारांची निवड कशी होणार ?
इस्रोमध्ये उमेदवारांची निवड लिखित परीक्षेच्या आधारे होईल. ही परीक्षा कंप्युटर बेस्ड टेस्ट फॉर्मेटमध्ये असेल. परीक्षेसाठी देशातील विविध शहरांमध्ये अर्ज करता येईल.https://ift.tt/ZP9B4yX या लिंकवरून तुम्ही थेट माहिती घेऊ शकता.
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: ISRO मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 1 लाखापेक्षा मिळणार जास्त पगार; असा अर्ज कराhttps://ift.tt/v9N70QG
0 टिप्पण्या