Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ३१ मे, २०२३, मे ३१, २०२३ WIB
Last Updated 2023-05-31T06:48:45Z
careerLifeStyleResults

वाहनचालकांनो सावधान! गाडीच्या डॅशबोर्डवर चष्मा ठेवल्यास लागू शकते आग; कसं ते जाणून घ्या...

Advertisement

<a href="https://ift.tt/RmpGP24 Sunglasses on Car Dashboard is Harmful : वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. चष्म्यामुळे (Sunglasses) तुमच्या गाडीला आग लागू शकते. हो, हे ऐकून तुम्हांला नवल वाटेल पण हे खरं आहे. अनेक वेळेस जणांना चष्मा किंवा सनग्लासेस कारच्या डॅशबोर्डवर ठेवण्याची सवय असते. पण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवलेल्या चष्म्यामुळे गाडीला आग लागू शकते. त्यामुळे गाडी चालकांनी याबाबतीत खबरदारी बाळगण्याची गरज आहे.

सावधान! गाडीच्या डॅशबोर्डवर सनग्लासेस ठेवणं पडेल महागात

इंग्लंडमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीनं गाडी उन्हात पार्किंगमध्ये उभी केली होती. या गाडीला अचानक आग लागली. इंग्लंडमधील नॉटिंगहॅमशायरमध्ये हा प्रकार घडला आहे. येथे अचानक दुपारी फायर अँड रेस्क्यू सर्व्हिस म्हणजेच अग्निशमन विभागाला आपत्कालीन फोन आला. एका कारला आग लागली होती आणि ही आग विझवण्यासाठी अग्निशमन पथकाला बोलावण्यात आलं. पण गाडीला आग नेमकी कशी लागली याबाबत काही समजण्यास मार्ग नव्हता

कारला आग लागण्याचं कारण समोर आलं नव्हतं.

अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असता गाडीच्या डॅशबोर्डच्या आजूबाजूचा भाग जळून खाक झाला होता. आगीमुळे कारचं विंडशील्ड वितळून मोठं छिद्र पडलं होतं. स्टेअरिंगच्या जवळील डॅशबोर्डचा बहुतांश भाग जळाला होता. अग्निशमन विभाग पोहोचेपर्यंत गाडीतील आग विझवण्यात आली होती. यानंतर कारला आग लागण्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु झाला. आधी याबाबत काहीच समजतं नव्हतं. मात्र, थोड्या तपासानंतर आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनुभवानंतर आगीमागचं कारण समोर आलं. यानंतर गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवलेला सनग्लासेसमुळे गाडीला आग लागल्याचं स्पष्ट झालं.

काय आहे प्रकरण?

कार पार्किंगमध्ये उन्हात उभी होती, कारच्या डॅशबोर्डवर सनग्लासेस ठेवलेले होते. सनग्लासेसच्या लेन्स सूर्यकिरणांना एकाच ठिकाणी केंद्रित करतात. तुम्ही लहानपणी हा प्रयोग नक्की केला असेल. भिंग वापरून उन्हाची किरण कागदावर एका ठिकाणी पडतात आणि त्यामुळे कागद जळतो. याचा प्रत्यय अनेकांनी घेतला असेलच. याचप्रमाणे डॅशबोर्डवर ठेवलेला चष्मा गाडीला आग लागण्याचं कारण ठरला.

गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवलेल्या सनग्लासेसच्या लेन्समधून सूर्यप्रकाश कारच्या विंडशील्डवर केंद्रित झाला. यामुळे विंडशील्ड इतकी गरम झाली की, आग लागली आणि काच वितळली आणि डॅशबोर्डवर पडली. गरम काचेने डॅशबोर्डचा काही भागही जळाला. यादरम्यान सूर्यप्रकाशामुळे आग आणखी भडकली आणि गाडीला आग लागली.

यापूर्वीही घडल्या आहेत अशा घटना

नॉटिंगहॅमच्या अग्निशमन आणि बचाव सेवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे कारच्या डॅशबोर्डवर चष्मा आणि सनग्लासेस यांसारख्या प्रकाश परावर्तित करणाऱ्या वस्तू ठेवू नका.

उन्हात चष्मा घातल्यास डोळ्यांचं नुकसान?

दरम्यान, आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, डोळ्यांना सूर्यकिरणांपासून वाचण्यासाठी घातल्या जाणाऱ्या सनग्लासेसमुळे आग लागू शकते, मग डोळ्यांच्या संरक्षणाचं काय किंवा चष्मा वापरल्यास तुमच्या डोळ्यांवर सूर्याची किरणे केंद्रित झाल्यासं डोळ्यांचं नुकसान होईल का, याबाबत जाणून घ्या. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, चष्मा किंवा सनग्लासेस घालून कधीही सूर्याकडे पाहू नये. सनग्लासेस, चष्मा, दुर्बीण किंवा इतर उत्पादने लेन्ससह सूर्याकडे पाहिल्यास डोळ्यांचं नुकसान होऊ शकते.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: वाहनचालकांनो सावधान! गाडीच्या डॅशबोर्डवर चष्मा ठेवल्यास लागू शकते आग; कसं ते जाणून घ्या...https://ift.tt/R7Ibk96