Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २४ मे, २०२३, मे २४, २०२३ WIB
Last Updated 2023-05-24T07:48:09Z
careerLifeStyleResults

Heart And Kidney Care Tips : तुमचं हृदय आणि किडनीचा असतो खास संबंध; एकाचं जरी आरोग्य बिघडलं तर होतो दुसऱ्यावर परिणाम

Advertisement

Heart And Kidney Care Tips : आपलं शरीर एक यंत्र आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शरीरातील प्रत्येक अवयवाचं एकमेकांशी काहीना काही कनेक्शन असतं. तुमचं हृदय आणि किडनी यांचाही एकमेकांशी संबंध असतो. जर हृदयाचं आरोग्य बिघडलं, तर त्याचा परिणाम किडनीवर होतो आणि जर किडनीचं आरोग्य बिघडलं, तर त्याचा परिणाम हृदयावर होतो. हृदय आणि किडनी यांचं मुख्य काम रक्त शुद्ध करणं आणि ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा करणं हे असतं, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे, शरीराचं कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी हृदय आणि किडनी महत्त्वाची भूमिका निभावतात.

हृदय आणि किडनीचं मुख्य कार्य रक्त शुद्ध करण्याचं आहे. हृदयाच्या कार्यात अडथळा आला, तर त्याचा परिणाम किडनीच्या कार्यावर होतो. आणि जर किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण झाला, तर त्याचा परिणाम हृदयावर होतो. परिणामी शरीराचं कार्यही बिघडतं. त्यामुळे शरीरातील या दोन महत्त्वाच्या अवयवांचं आरोग्य उत्तम राखणं अत्यंत आवश्यक आहे. जाणून घेऊयात हृदय आणि किडनी यांचा एकमेकांशी संबंध काय यासंदर्भात सविस्तर...

या दोन्ही अवयवांचं एकमेकांशी खास कनेक्शन?

हृदयाचं काम संपूर्ण शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवठा करणं आणि किडनीचं काम रक्त शुद्ध करणं हे आहे. किडनी आपल्या संपूर्ण शरीरातील रक्त शुद्ध करतं, रक्तातील अशुद्ध, अपायकारक घटक किडनी रक्तातून काढून टाकते. जर किडनी व्यवस्थित काम करत नसेल, तर रक्तातील अपायकारक पदार्थ वेगळे होऊ शकणार नाही. आणि अशुद्ध रक्ताचा पुरवठा संपूर्ण शरीराला होईल, याचा परिणाम हृदयावर होईल. तसेच, जर हृदय नीट काम करत नसेल तर किडनीला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा होणार नाही. याशिवाय हृदयाचं आरोग्य बिघडलं तर शरीराला नीट रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. यामुळे गंभीर आजार जडू शकतात. म्हणूनच दोन्ही अवयवांचं आरोग्य राखणं अत्यंत आवश्यक आहे.

दोन्ही अवयवांची काळजी कशी घ्याल?

आपलं हृदय आणि किडनी तंदूरूस्त ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच, तेलकट, तूपकट, मसालेदार पदार्थांचं अतिसेवन टाळा.

तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करा. अन्यथा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

शरीराच्या उंचीनुसार वजन संतुलित राखण्याचा प्रयत्न करा. वाढलेल्या वजामुळेही शरीराच्या अनेक समस्या उद्भवतात. याचा परिणामही किडनी आणि हृदयावर होतो.

वाढत्या वयासोबत फॅटयुक्त आहार खाण्यावर कंट्रोल करण्याची आवश्यकता आहे.

धुम्रपान शरीरासाठी हानिकारक आहे. धुम्रपानाचा परिणाम हृदयावर होतो. यामुळे तुमचं हृदय कमजोर होऊन किडनीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सिगरेट पिणं टाळा.

वरील सर्व समस्यांचा सामना करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा. यामुळे ह्रदय आणि किडनी दीर्घकाळ तंदूरूस्त राहण्यास मदत मिळते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/r7VdMcF Tips : आता हृदय राहिल सदृढ, आजारांची होईल सुट्टी; तु्म्हाला फक्त जीनशैलीत करावे लागतील 'हे' पाच बदल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Heart And Kidney Care Tips : तुमचं हृदय आणि किडनीचा असतो खास संबंध; एकाचं जरी आरोग्य बिघडलं तर होतो दुसऱ्यावर परिणामhttps://ift.tt/G2qlbrn