Advertisement

<a href="https://ift.tt/oJvjcuk After Medicine : इंटरनेटवर कधी, कोणती गोष्ट व्हायरल होईल काही सांगता येत नाही. इंटरनेवर अनेक वेळा आरोग्यासंबंधित माहिती किंवा उपाय तसेच टीप्सही व्हायरल होतात. पण इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या सर्वच गोष्टी खऱ्या ठरतात, असं नाही. इंटरनेटवरील आरोग्यासंबंधित दावे किंवा उपायांवर विश्वास ठेवण्याआधी तज्ज्ञ आणि डॉक्टरांना विचारा आणि त्यांचा सल्ला नक्की घ्या. सध्या इंटरनेटवर एक दावा खूप व्हायरल होत आहे. या दाव्यामध्ये सांगितलं जात आहे की, एखाद्या व्यक्तीने औषध घेतल्यानंतर लगेचच द्राक्षं खाल्ली तर, संबंधित व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

आज आपण इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या दाव्यामागचं सत्य जाणून घेणार आहोत.

व्हायरल दावा काय?

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या दाव्यांमध्ये असा दावा केला जात आहे की, जर एखाद्या व्यक्तीने औषध घेतल्यानंतर लगेच द्राक्षं खाल्ली तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. औषधानंतर द्राक्षं खाल्यावर त्याची रासायनिक प्रतिक्रिया होते, यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. अशा परिस्थितीत औषध घेतल्यानंतर द्राक्षे खाऊ नयेत, अन्यथा हा त्रास होऊ शकतो, असा दावा केला जात आहे.

यामागचं सत्य काय आहे?

आता यामागची खरी वस्तुस्थितीत काय आणि यामध्ये किती तथ्य आहे ते जाणून घ्या. काही वेबसाइट्सनी या व्हायरल दाव्यामागची सत्यता तपासली आहे. यामध्ये, हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं आढळून आलं आहे. एखाद्या व्यक्तीने औषध घेतल्यानंतर लगेच द्राक्षे खाल्ल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो, असं कोणतंही कारण समोर आलेलं नाही. अनेक आरोग्य तज्ज्ञांनी याबाबत सांगितलं आहे की, या दाव्यात तथ्य नाही, असं काही होत नाही. या दाव्याच्या पडताळणीमध्ये समोर आलं आहे की, काही औषधे आणि द्राक्ष एकमेकांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्यात रासायनिक क्रिया होते. काही औषधे अशी आहेत, ज्यावर द्राक्षांवर प्रतिक्रिया देतात. पण याचा अर्थ असा होत नाही की, यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. आतापर्यंत अशी कोणतीही घटना समोर आलेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/Wn9AvXh Tips : तुम्हीही वॉक करताना 'या' चुका करताय?, आरोग्यावर होईल वाईट परिणाम

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: औषधानंतर द्राक्ष खाणं जीवघेणं, होऊ शकतो मृत्यू? या दाव्यामागचं नेमकं सत्य काय?https://ift.tt/7bPMIfc
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: औषधानंतर द्राक्ष खाणं जीवघेणं, होऊ शकतो मृत्यू? या दाव्यामागचं नेमकं सत्य काय?https://ift.tt/7bPMIfc