Advertisement

Health Care: तुम्हालाही रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय आहे का? तुम्हाला रात्री झोप लागत नाही आणि तुम्ही संपूर्ण रात्र फोनवर किंवा टीव्ही पाहण्यात घालवता का? जर तुम्ही असं करत असाल तुमच्यासाठी हे फार धोक्याचं आहे, कारण रात्री जागरण करणाऱ्या लोकांना अकाली मृत्यूचा धोका आहे. रात्री जागणाऱ्यांचं आयुष्य कमी असतं, असं आता समोर आलं आहे. अनेक अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रात्री जागणं म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण देण्यासारखं आहे.

ज्या लोकांना रात्री जागण्याची सवय असते, अशा लोकांना कमी वयात मृत्यूचा धोका असतो. तज्ज्ञांनी अशी कारणंही शोधून काढली आहेत, ज्यांमुळे रात्री जागणाऱ्या लोकांच्या आयुष्याची वर्षे (<a href="https://ift.tt/gYLTCDv Life Span) कमी होऊ शकतात. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जे लोक रात्री जागतात ते जास्त धूम्रपान आणि मद्यपान करतात, जे शरीरासाठी अधिक घातक ठरतं. ज्या लोकांना रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय आहे त्यांनी आता ही सवय बदलावी, कारण यामुळे शरीरात अनेक प्रकारचे धोकेही निर्माण होऊ शकतात.

मिळालेल्या डेटावरून उघड झालं मृत्यूचं रहस्य

सुमारे 23,000 मुलांचा डेटा पाहिल्यानंतर संशोधकांनी हा अनुमान लावला आहे. या सर्व मुलांनी 1981 ते 2018 या कालावधीत फिनिश ट्विन कोहॉर्ट स्टडीमध्ये भाग घेतला होता. त्यापैकी 8,728 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता धक्कादायक माहिती समोर आली. असे आढळून आले की जे लोक रात्री जागतात त्यांच्या मृत्यूचा दर रात्री लवकर झोपणाऱ्यांपेक्षा 9 टक्के जास्त असतो.

मात्र, या अभ्यासात एक दिलासादायक बाबही सांगण्यात आली आहे. जे लोक रात्री जागे राहतात आणि ड्रग्स घेत नाहीत, त्यांना अशा प्रकारे लवकर मरण्याचा धोका नाही. मात्र रात्री उशिरापर्यंत जागे राहून दारू पिणाऱ्या लोकांच्या मृत्यूचे कारण नशा आहे.

अभ्यासाचे लेखक काय म्हणाले?

फिन्निश इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ (Finnish Institute of Occupational Health) फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे आहे. येथील क्रिस्टर हब्लिन यांनी हा अभ्यास लिहिला आहे. त्यांनी एका अभ्यासात म्हटले आहे की, रात्रीपर्यंत जागे राहणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यूचा धोका तेव्हाच वाढतो जेव्हा ते मोठ्या प्रमाणात तंबाखू आणि दारूचे सेवन करतात. हा अभ्यास 'क्रोनोबायोलॉजी इंटरनॅशनल: द जर्नल ऑफ बायोलॉजिकल अँड मेडिकल रिदम रिसर्च'मध्ये प्रकाशित झाला आहे.

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/JTYxhbA Care : उन्हामुळे होत आहेत केस खराब? चमकदार आणि दाट केसांसाठी करा 'हे' 5 उपाय

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Care: रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांचं आयुष्य कमी; वाचा काय आहे कारण?https://ift.tt/1tcJ8KO
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Care: रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांचं आयुष्य कमी; वाचा काय आहे कारण?https://ift.tt/1tcJ8KO