Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १६ जून, २०२३, जून १६, २०२३ WIB
Last Updated 2023-06-16T00:48:17Z
careerLifeStyleResults

Health Tips : सकळ उठलयबरबर तमहलह वरवर शक यतत? 'ह' आह मळ करण; 'अश' कर सटक

Advertisement

Morning Sneezing Problem : दिवसाची सुरुवात प्रसन्न आणि उत्साही असावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण, प्रत्येकाच्याच बाबतीत हे घडतं असं नाही. आपली सकाळ प्रसन्न न होण्यामागे अनेक कारणं असतात. जसे की, कोणाच्या पोटात दुखतं, कोणाला खोकला, सर्दी यांसारखी लक्षणं जाणवतात. यातलंच एक मुख्य कारण आहे ते म्हणजे शिंका येणे.  अनेकांची तक्रार असते की, सकाळी उठल्याबरोबर त्यांना शिंका येण्यास सुरुवात होते जी थांबत नाही. सकाळी अंथरुणातून उठल्याबरोबर एकापाठोपाठ एक शिंका येऊ लागते आणि संपूर्ण मूड खराब होतो. काही वेळा शिंका येण्याव्यतिरिक्त नाक आणि घशातही खाज येते. जर तुम्ही किंवा तुमची जवळची व्यक्ती या समस्येला बळी पडली असेल तर तुम्हाला या आजाराविषयी माहिती असणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊयात सकाळी शिंका येण्यामागचं नेमकं कारण काय आहे.

ऍलर्जीक राईनाइटिस 'हे' आहे कारण

सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला जर शिंका येत असतील तर त्याला 'ऍलर्जीक राईनाइटिस' (Allergic Rhinitis) म्हणतात. ही एक प्रकारची ऍलर्जी आहे जी काही लोकांना खूप त्रास देते. ज्या लोकांना ही ऍलर्जी आहे, त्यांना सकाळी उठल्याबरोबर शिंक येते आणि घशाला खाज सुटू लागते. याचे कारण म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आजूबाजूची धूळ आणि हानिकारक कण नाकातून शरीरात प्रवेश करतात. नाकाने धुळीचे कण थांबवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा अनेक धुळीचे कण एकाच वेळी शरीरात जातात आणि त्यांच्या प्रतिक्रियेमुळे घशात खाज सुटण्याबरोबरच शिंका येण्यास सुरुवात होते. ऍलर्जीक राईनाइटिस अधिक तीव्र झाल्यास, नाक आणि घशात खाज सुटण्याबरोबरच चेहऱ्यावर सूज येऊ शकते.

तापमानातील बदलामुळेही शिंका येतात

धूळ हे ऍलर्जीक राईनाइटिसचे एकमेव कारण नाही. कधीकधी तापमानात बदल झाल्यामुळे, ऍलर्जीक राईनाइटिस देखील होतो आणि व्यक्तीला शिंका येणे सुरू होते. जेव्हा एखादी व्यक्ती झोपते तेव्हा त्याच्या शरीराचे तापमान कमी होते आणि जागे होताच तापमान वाढू लागते. या तापमानातील बदलामुळे नाकाची प्रणाली असंतुलित होते आणि शिंका येण्यास सुरुवात होते.

अशा प्रकारे शिंकेपासून सुटका करा

1. तुम्हाला जर ऍलर्जीक राईनाइटिसचा त्रास असेल तर, हलके अन्न खाण्याची सवय लावा. अन्नामध्ये सैंधव मीठ वापरा. नेहमी कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
2. 10-12 तुळशीची पाने, 1/4 चमचा काळी मिरी पावडर, दीड चमचा किसलेले आले एक कप पाण्यात मंद आचेवर उकळवा. उकळल्यानंतर पाणी जेमतेम अर्धे राहिले की ते गाळून प्यावे. रोज सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर प्यायल्याने तुम्हाला काही दिवसांत फरक जाणवेल.
3. एक कप कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार जाड मीठ मिसळून प्यायल्याने या समस्येत लवकर आराम मिळतो. हळदीमध्ये असलेले अँटी-एलर्जिक, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असलेले घटक नासिकाशोथपासून मुक्त होण्यास मदत करतात.
4. एक चमचा मधात थोडी आवळा पावडर मिसळून दिवसातून दोनदा सेवन करा. याशिवाय पुदिन्याच्या पानांपासून बनवलेला चहा प्यायल्याने या समस्येत बराच आराम मिळतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/pdOEJsh Tips : फिट राहण्यासाठी फक्त जॉगिंग नाही...'रिव्हर्स वॉकिंग'सुद्धा फायदेशीर; जाणून घ्या आरोग्यासाठीचे फायदे

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : सकाळी उठल्याबरोबर तुम्हालाही वारंवार शिंका येतात? 'हे' आहे मूळ कारण; 'अशी' करा सुटकाhttps://ift.tt/z1LDGFU