Advertisement

Home Remedy For White Hair: केस तुमच्या सौंदर्यात भर घालतात, म्हणूनच प्रत्येकाला काळेभोर लांब आणि दाट केस हवे असतात. पण आजची जीवनशैली, धकाधकीचं जीवन, खाण्यापिण्याच्या सवयी आणि वाढत्या प्रदूषणामुळे तुमचे केस वेळेआधीच पांढरे होऊ लागतात. पांढरे केस काळे करण्यासाठी अनेकजण विविध उपाय करतात. काहीजण बाजारातून रंग विकत घेतात, जे अनेक हानिकारक रसायनांनी भरलेले असतात.

केसाच्या रंगाचा किंवा मेहंदीचा रंग केसांवर जास्त काळ टिकत नाही. काही दिवसांनी केस पुन्हा पांढरे दिसू लागतात आणि ज्यामुळे थोड्या दिवसांनी तुम्हाला पुन्हा केस रंगवण्याची प्रकिया करावी लागते. अशा वेळी, आज आम्ही तुमच्यासाठी घरच्या घरीच काही नैसर्गिक उपायांद्वारे केस पांढरे कसे करायचे त्याच्या काही पद्धती घेऊन आलो आहोत.

केस काळे करण्यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय

कढीपत्ता

प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात मिळणाऱ्या कढीपत्त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, याचा उपयोग अनेक प्रकारच्या रोगांवर देखील होतो. पांढरे केस काळे करण्यासाठी देखील कढीपत्त्याचा वापर होतो. हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी 2 चमचे आवळा पावडर आणि 2 चमचे ब्राह्मी पावडर घेऊन त्यात बारीक कडीपत्ता घाला. पाणी टाकून या तिन्हीचं मिश्रण तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळांपर्यंत नीट लावा आणि केस 1 तासापर्यंत तसेच ठेवा. नंतर गरम पाण्याने आणि शाम्पूने केस धुवून टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा.

आवळा पावडर

पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही आवळ्याचा पावडरचा देखील वापर करू शकता, याच्या वापराच्या विविध पद्धती आहेत. तुम्ही आवळा पावडर खोबरेल तेलात मिक्स करुन केसांना लावू शकता किंवा दुसरी पद्धत म्हणजे, एक कप आवळा पावडर राखाडी रंग येईपर्यंत लोखंडी भांड्यात चांगली भाजून घ्या, यानंतर त्यात 500 मिली खोबरेल तेल मिसळा आणि हे मिश्रण गॅसवर मंद आचेवर 20 मिनिटं गरम करा. त्यानंतर हे तेल थंड करुन 24 तासांसाठी हवाबंद बाटलीत ठेवून द्या. त्यानंतर आठवड्यातून दोनदा तुम्ही या तेलाचा वापर करू शकता.

खोबरेल तेल

खोबरेल तेलात तेलामध्ये बायोटिन, आर्द्रता आणि इतर घटक असतात, जे पांढरे केस काळे करण्यास मदत करतात. लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून लावल्याने केस नैसर्गिकरित्या काळे होतात. दोन भाग खोबरेल तेल आणि एक भाग लिंबाचा रस मिसळून तेलाचा मसाज केल्याने केस काळे होतात.

काळा चहा

पांढरे केस काळे करण्यासाठी काळा चहा (ब्लॅक टी) हा एक उत्तम उपाय आहे. जुन्या काळापासून केस काळे करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते.यासाठी काळा चहा उकळून थंड करा. त्यानंतर हा चहा किमान दोन तास केसांना सावून ठेवा आणि नंतर केस शॅम्पूने धुवून टाका. तुम्ही काळ्या चहाचं पाणी मेहंदीत मिक्स करुन केसांना लावल्यास देखील चांगला फायदा मिळतो.

कांद्याचा रस

कांद्यात सल्फर हा घटक असतो, ज्यामुळे केस काळे होण्यास मदत होते. केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी कांद्याचा रस फायदेशीर आहे. दोन ते तीन कांदे कापून त्याचा रस काढा आणि नियमित केसांना लावा. त्यामुळे केसगळती थांबते आणि केस काळे होण्यास देखील मदत होते.

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/m2KEzwo Tips: पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी लक्षात ठेवा 5 गोष्टी; अशा पद्धतीने काळजी घेतल्यास आजार राहतील दूर!

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Home Remedy For White Hair: 'या' उपायांनी केस होतील नैसर्गिक पद्धतीने कायमचे काळे; नेहमी केस रंगवण्याचा ताण होईल दूरhttps://ift.tt/z1LDGFU
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Home Remedy For White Hair: 'या' उपायांनी केस होतील नैसर्गिक पद्धतीने कायमचे काळे; नेहमी केस रंगवण्याचा ताण होईल दूरhttps://ift.tt/z1LDGFU