Advertisement
Health Tips : राज्यात काही भागांत हलक्याशा प्रमाणात पावसाला सुरुवात झाली असली तरी मात्र उन्हाच्या <a href="https://ift.tt/bEFazuc> झळा काही कमी होत नाहीयेत. कडक उन्हामुळे आपल्या त्वचेला तर त्रास होतोच पण त्याचबरोबर डोळ्यांवर देखील सूर्याच्या उष्णतेचा गंभीर परिणाम होतो. अशा परिस्थितीत डोळ्यांची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे. सूर्यापासून येणारे हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरण उन्हाळ्यात नकळत तुमच्या डोळ्यांना धोका देऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांत जळजळ, लालसरपणा, खाज सुटणे अशा समस्या उद्भवू शकतात. डोळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यास हानी पोहोचू शकते. उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. वाढते तापमान, सूर्यप्रकाश आणि धूळ यामुळे डोळ्यांना जास्त संसर्ग, कोरडेपणा आणि तणावाचा सामना करावा लागतो. 
उन्हाळ्यात डोळ्यांना त्रास का होतो?
डोळे हा आपल्या त्वचेचा, शरीराचा एक संवेदनशील भाग आहे. डोळे उष्णता जास्त सहन करू शकत नाही. याच कारणामुळे उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा डोळ्यांवर परिणाम होतो. याबरोबरच उन्हाळ्याच्या दिवसांत हवा कोरडी पडते आणि त्याचवेळी हवेत धूळ आणि इतर प्रदूषणाचे कण उडू लागतात, जे डोळ्यांच्या संपर्कात आल्यावर डोळ्यांना त्रास होतो. 
उन्हाळ्यात डोळ्यांची लक्षणे
उष्णतेचा डोळ्यांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो, त्यामुळे त्याची लक्षणेही अनेक प्रकारची असतात.
1. डोळ्यांतून वारंवार पाणी येणे.
2. बाहेरून आल्यावर डोळे लाल होणे.
3. सूर्यप्रकाशात नीट न दिसणे.
4. सूर्यप्रकाशामुळे डोकेदुखीचा त्रास होणे.
5. धूळ आणि घाणीमुळे डोळ्यांत जळजळ होणे आणि खाज सुटणे.
6. डोळे कोरडे होणे.
उष्णतेपासून डोळ्यांचे संरक्षण कसे करावे?
उन्हाळ्यात ज्या प्रकारे आपण आपल्या त्वचेची आणि केसांची उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी काळजी घेतो. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या सुरक्षेसाठीही काही पद्धतींचा अवलंब करावा लागतो. कारण उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. हे टाळण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता. 
1. वेळोवेळी डोळे स्वच्छ पाण्याने धुवा.
2. बाहेर जाताना गॉगल वापरा.
3. धुळीच्या ठिकाणी जाऊ नका.
4. दुपारी शक्यतो घरीच राहा.
5. चेहऱ्यावर चष्मा लावून घाम येऊ देऊ नका. 
6. डोळ्यांना वारंवार हात लावू नका.
7. वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
तेजस्वी प्रकाशापासून डोळ्यांचे रक्षण करा
उन्हाळ्यात डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वप्रथम डोळ्यांना तेजस्वी प्रकाशापासून वाचवा. यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी सनग्लासेस लावा. जर तुम्हाला सनग्लासेस लावणे आवडत नसेल तर तुम्ही छत्री, स्कार्फ, टोपी यांसारख्या गोष्टी वापरून डोळ्यांचं रक्षण करू शकता. 
शरीर हायड्रेटेड ठेवा
उन्हाळ्यात डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात आधी शरीराला हायड्रेट ठेवा. यासाठी दिवसातून किमान 8 ते 9 ग्लास पाणी प्या. त्याचबरोबर फळे खा, यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहील. 
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : उन्हाळ्यात डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी 'अशी' काळजी घ्या; जळजळ आणि लालसरपणाही होईल दूरhttps://ift.tt/1tcJ8KO