Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २० जून, २०२३, जून २०, २०२३ WIB
Last Updated 2023-06-19T18:48:49Z
careerLifeStyleResults

Picnic Spot Mumbai : मबईकरन पकनकल जयच बत आखतय? ह 9 परयय आहत बसट

Advertisement

Mumbai Picnic Spot : पुढील काही दिवसांत राज्यभरात जोरदार पाऊस कोसळेल. त्यामुळे अनेक निसर्गरम्य ठिकाणं आणखी बहरुन जातील. त्यात पावसाळा सुरु झाला की प्रत्येकजण सहलीचं नियोजन करतो.. कोण कुटुंबासोबत तर कोण मित्र-मैत्रिणींसोबत सहलाचा बेत आखतात. म्हणजेच काय तर.... पावसाळा आला की सर्वांनाच वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. त्यासाठी मग गुगलवर जवळच्या जागेचा शोध घेतला जातो.. अथवा सहकाऱ्यांना विचारणा केली जाते... तुमचं हेच टेन्शन कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.. मुंबईजवळ पावसाळ्यात फिरायला फिरण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांची माहिती देणार आहोत... तुम्ही एक-दोन दिवसाच्या सुट्टीत सहलीचा आनंद घेऊ शकता...

पावसाळा सुरु झाला की,  डोंगराळ भागातील नद्या, धरणे, धबधबे, डोंगररांगा, दऱ्या खोऱ्यांनी हिरवी शाल अंगावर ओढलेली असते. निसर्गाचे हे मनमोहक रुप पाहून मनाला एक प्रसन्नता मिळते. धबधब्यांमध्ये चिंब भिजण्याचा आनंद लुटायला कोणाला आवडणार नाही. त्यामुळे पावसाळ्यात  फिरायला जातात. या पावसाळ्याच तुम्ही देखील फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर तुम्हाला काही ठिकाणाची माहिती देणार आहोत. आज आपण जाणून घेऊया मुंबई जवळ असलेल्या पाच पिकनिक स्पॉटविषयी

माथेरान -
महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांमध्ये माथेरानचा समावेश होते. हे मुंबईपासून जवळ असलेले पर्यटन स्थळ आहे. माथेरानचे निसर्ग सौंदर्य, जंगल नेहमीच इथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालते. पावसाळयात माथेरानचे जंगल पालथे घालणे एक अविस्मरणीय अनुभव असतो. माथेरान मुंबईपासून 100 तर पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे.

संजय गांधी नॅशनल पार्क -
बोरिलीमधील संजय गांधी नॅशनल पार्क हे सहलीसाठी असलेले एक उत्तम ठिकाण आहे.  मुंबई पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये पावसाळयात एक वेगळा अनुभव मिळतो. वेगवेगळया प्रकारची झाडे, वनस्पती, प्राणी, पक्ष्यांनी हे जंगल समृद्ध आहे.

गोराई -
गोराई समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.  बोरीवली व भाईंदरवरुन तुम्ही इथे सहज पोहोचू शकता.  बोरीवली स्थानकात उतरल्यानंतर तुम्ही बस किंवा रिक्षाने गोराईला पोहोचा. तिथून लाँचने तुम्हाला गोराई किनाऱ्यावर जाता येते.

खंडाळा आणि लोणावळा -
लोणावळा आणि खंडाळा भारतातील प्रमुख पर्यटन स्थळापैकी एक आहे. मुंबई-पुण्यात पासून जवळ असल्याने विकेंडला पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.  या ठिकाणी उंच डोंगररांगा, धबधबे विपुल वनसंपदा किल्ले लेणी थंड हवा यासारख्या नैसर्गिक साधन संपत्ती बरोबरच मनोरंजन पार्क थीम पार्क कॅम्पिंग पॅराग्लायडिंग बंजी जंपिंग यासारख्या अॅक्टिव्हिटीमुळे प्रमुख आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. लोणावळ्यात रे वूड पार्क, वाळवण डॅम, टायगर्स पॉईंट असे अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत. पावसाळ्यात पर्यटकांसाठी टायगर धबधबा हे प्रसिद्ध ठिकाण आहे.

येऊर -
येऊर  हे ठिकाण ठाणे जिल्ह्यात आहे. पक्षी निरीक्षण आणि जंगल भ्रमंतीची तुम्हाला आवड असेल तर एकदा येऊरला नक्की भेट द्या.  छोटया-छोटया टेकडया आणि जंगलामुळे इथे भटकंती करताना एक वेगळा आनंद मिळतो.

कर्जत -
पावसाळ्यात विलोभनीय धबधबे शिवाय धरणाच्या सांडव्यातून वाहणारं पाणी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतं. त्याशिवाय येते अनेक रिसॉर्टही आहेत. एक दिवसाच्या पिकनिकसाठी मुंबईकरांना हा उत्तर पर्याय असू शकतो.

अलिबाग -
अलिबागमध्ये अनेक समुद्र किनारे आहेत. त्यामुळे हा परिसर पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरलाय. एक दिवसाच्या पिकनिकसाठी मुंबईकरांसाठी हा बेस्ट पर्याय आहे.

चिंचोटी -
पावसाळयात धबधब्याला तरुणाईची विशेष पसंती असते. कडेकपारीतून कोसळणाऱ्या धबधब्याखाली उभे राहण्यात एक वेगळी मजा येते. पावसाळयात मुंबई-अहमदाबाद मार्गावरील चिंचोटी धबधब्याकडे तरुणाईची पावले वळतात. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी गर्द हिरव्यागार झाडीतून मार्ग काढावा लागतो.

माळशेज -
माळशेज घाट हे पावसाळ्यात फुलणारं नंदनवन आहे. पावसाळ्यामध्ये माळशेज घाटातील दृष्य डोळ्यात सामावून घ्यावं तेवढं कमी पडतं. हा घाट अहमदनगर ते कल्याण दरम्यानचा सर्वात मोठा घाट आहे. माळशेज घाटातील धबधबे, फुललेल्या डोंगररांगा यांचं दुर्मिळ दृष्य पाहण्याची संधी पर्यटकांना पावसाळ्यात असते.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Picnic Spot Mumbai : मुंबईकरांनो पिकनिकला जायचा बेत आखताय? हे 9 पर्याय आहेत बेस्टhttps://ift.tt/1tcJ8KO