Advertisement

Excessive Use OF Multani MItti : चेहऱ्यासाठी एक नैसर्गिक उपाय म्हणून मुलतानी माती वापरली जाते. याच्या वापरामुळे त्वचा सुंदर आणि छान होते. चेहऱ्यावर असणारे काळे डाग , पिगमेंटेशन (Pigmentation) देखील मुलतानी मातीच्या वापराने कमी होण्यास मदत होते. मुलतानी मातीमध्ये मिनरल्सचे प्रमाण जास्त असल्याकारणाने याचा त्वचेला खूप फायदा होतो. मुलतानी मातीचा लेप चेहऱ्याला लावल्यास त्वचा मऊ आणि ग्लोइंग होते. मात्र याच मुलतानी मातीचा जास्त प्रमाणात वापर केला तर त्याचे अनेक नुकसान चेहऱ्याला होऊ शकतात.

मुलतानी माती चेहऱ्याला लावणे खरोखरच हानिकारक आहे का?

खरे तर त्वचेसाठी मुलतानी माती उत्तम मानली जाते. मात्र याचा वापर योग्य प्रमाणात केला नाही तर स्किनला बरेच नुकसान होऊ शकते. काय आहेत मुलतानी मातीचे साइड इफेक्टस (Side Effects) जाणून घेऊयात.

1. कोरडी त्वचा

ज्यांची स्किन खूप तेलकट आहे. ते लोक मुलतानी मातीचा लेप चेहऱ्याला लावतात. पण अशा वेळी ऋतू पाहून मगच हा लेप चेहऱ्याला लावावा. हिवाळ्यात लोक मुलतानी मातीचा लेप चेहऱ्याला लावू नये. हिवाळ्यात या लेपने तुमची स्किन कोरडी (Dry) पडू शकते.

2. त्वचा ताणली जाऊ शकते

कोरडी त्वचा असणाऱ्यांनी मुलतानी माती लावण्याआधी त्यात अॅलोवेरा जेल (Aleovera gel) , बदामाचे तेल (Almond Oil) किंवा मध (Honey) मिक्स करावा. फक्त मुलतानी माती चेहऱ्याला लावल्यास तुमची त्वचा कोरडी पडते आणि वयाच्या आधीच चेहऱ्यावर सुरकुत्या येतात.

3. नाजुक त्वचा असल्यास होते नुकसान

तुमची त्वचा नाजुक (Sensitive) असल्यास मुलतानी मातीचा वापर करणे बंद करावे. नाजुक त्वचेवर मुलतानी मातीचा लेप लावल्यास चेहऱ्यावर इनफेक्शन होऊ शकते.

"या" प्रकारच्या त्वचेच्या लोकांनी मुलतानी मातीचा वापर करणे टाळावे

1. ज्यांची त्वचा नाजुक आहे अशांनी मुलतानी मातीचा वापर करणे बंद करावे. याच्या वापराने चेहरा काळा पडू शकतो.

2. कोरडी त्वचा असणाऱ्यांनी देखील मुलतानी मातीचा लेप चेहऱ्याला लावू नये. ज्यामुळे त्वचा मोठ्या प्रमाणात ताणली जाऊ शकते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येतात.

3. जर तुम्हाला कायम सर्दी , खोकला असेल तर मुलतानी माती वापरू नये. थंड असलेल्या मुलतानी मातीच्या वापरामुळे सर्दी , खोकला वाढण्याची शक्यता असते.

4. मुलतानी माती रोज चेहऱ्याला लावणे टाळावे.

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/yxB0roY Medicine Ban : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! धोकादायक 14 फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Multani Mitti : मुलतानी माती चेहऱ्याला लावल्याने होऊ शकतात हे नुकसान; वाचा सविस्तरhttps://ift.tt/PeWZpTK
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Multani Mitti : मुलतानी माती चेहऱ्याला लावल्याने होऊ शकतात हे नुकसान; वाचा सविस्तरhttps://ift.tt/PeWZpTK