Advertisement

<a href="https://ift.tt/fXWkePV Growling : पोटात गुडगुड होणं अगदी सामान्य मानलं जातं. पचनाच्या वेळी पोटातील गॅस, द्रव आणि घन पदार्थांची हालचाल यामुळे गुडगुड असा आवाज येतो, असं म्हटलं जातं. पोट बिघडल्यासही पोटातून अशाप्रकारे आवाज येतात. या आवाजाला 'बोरबोरिग्मी' (Borborygmi) असं म्हणतात. ही समस्या काही काळासाठी असल्यास ही सामान्य बाब आहे, पण ही समस्या दीर्घकाळ असल्यास याकडे दुर्लक्ष करु नका. असं करणं तुमच्यासाठी नुकसानदायक ठरु शकतं. पोटात गुडगुड होण्याची समस्या दिर्घकाळ राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पोटात गुडगुड होण्याचा आवाज (Stomach Growling) कोणत्या आजारांचे संकेत आहे जाणून घ्या.

भूख लागणे

पोट रिकामे असल्यास आणि भूक लागली असल्यास पोटातून गुडगुडण्याचा आवाज येऊ शकतो. तुम्ही अन्न खाल्ल्यावर हा आवाज कमी होतो. त्यामुळे पोटात गुडगुड झाल्यावर खाल्लं पाहिजे.

पचनामध्ये समस्या

घाईघाईत जेवणं, खूप जलद खाणं, आम्लयुक्त पदार्थ खाणं, गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग (GERD) किंवा इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) यामुळे देखील पोटात गुडगुड होऊ अस्वस्थ वाटू शकतं.

ऍलर्जी

बर्‍याच वेळा जेव्हा आपण लैक्टोज किंवा ग्लूटेनन युक्त अन्न खातो तेव्हा त्यांच्या पचनामध्ये समस्या निर्माण होतात. त्यामुळे पोटात गुडगुडण्याचा आवाज येऊ शकतो.

गॅस्ट्रोएन्टेरिटिस

गॅस्ट्रोएन्टेरिटिस, पोट आणि आतड्यांमध्ये संसर्ग किंवा जळजळ झाल्यामुळेही पोटातून गुडगुड असा आवाज येऊ शकतो. याला स्टमक फ्लू (Stomach Flu) असंही म्हणतात. या समस्येमुळे जुलाब, उलट्या आणि पोटदुखीसारख्या समस्या होऊ शकतात

आतड्यांसंबंधी समस्या

अन्न पचनादरम्यान आतड्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे पोटात गुडगुडण्याचा आवाज येतो. त्यामुळे पोटदुखी, पोट फुगणे, बद्धकोष्ठता किंवा उलट्या यांसारखी लक्षणेही दिसू लागतात. असे झाल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

'या' समस्यांचाही धोका

पोटात सतत दुखणे, आतड्याची हालचाल बदलणे किंवा वजन कमी होणे, पोटातून गुडगुड आवाज येण्यासमागचं कारण ठरू शकतं. यासोबतच इन्फ्लेमेट्री बाउल डिसीज, सेलिएक रोग किंवा डायव्हर्टिकुलिटिस हे आजारही याला कारणीभूत ठरतात.

पोटात गुडगुड आवाज आल्यावर काय कराल?

अन्नपचनावेळी पोटातील हालचाली आणि क्रियांमुळे गुडगुड आवाज होणं सर्वसामान्य आहे. मात्र, ही समस्या दिर्घकाळ जाणवत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याकडे दुर्लक्ष केल्यास समस्या वाढेल आणि हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरेल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/JMwtruP Tips : उन्हाळ्यात 'हे' पेय पिणं म्हणजे आरोग्याशी खेळ, तुम्ही 'ही' चूक करु नका

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Stomach Growling : सावधान! पोटातून गुडगुड आवाज येतोय? याकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, नाहीतर...https://ift.tt/PeWZpTK
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Stomach Growling : सावधान! पोटातून गुडगुड आवाज येतोय? याकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, नाहीतर...https://ift.tt/PeWZpTK