Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
रविवार, १६ जुलै, २०२३, जुलै १६, २०२३ WIB
Last Updated 2023-07-16T00:48:39Z
careerLifeStyleResults
Health Tips : 'हे' 5 पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी वरदान; हृदयविकाराचा धोकाही होईल कमी, वाचा सविस्तर
Advertisement
'या' पदार्थांच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो
अक्रोड : जर तुम्ही तुमच्या आहारात अक्रोडाचा समावेश केला तर ते तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी लक्षणीयरीत्या कमी करू शकते. त्याच्या मदतीने तुम्ही हृदयविकार कमी करू शकता. वास्तविक अक्रोडमध्ये फायबर, ओमेगा-3 आणि फॅटी अॅसिड असतात. त्यांच्या मदतीने खराब कोलेस्ट्रॉल कमी करता येते. एकंदर आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे.
संत्री : हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही आहारात संत्र्याचाही समावेश करू शकता. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम आढळते. याशिवाय त्यात पेक्टिन देखील आढळते. या सर्व घटकांच्या मदतीने तुम्ही तुमचे बीपी नियंत्रणात ठेवू शकता. यामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि हाय बीपीची समस्या कमी होऊ शकते. जेव्हा तुमचे बीपी नियंत्रणात असेल, तेव्हा तुम्हाला हृदयविकार होणार नाही.
अळशी : फ्लेक्ससीड ज्याला आपण अळशी म्हणून ओळखतो. हे खाल्ल्याने तुम्ही खराब कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी करू शकता. त्यात ओमेगा 3 फॅटी अॅसिडसह अँटीऑक्सिडंटही आढळतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.
दही : लो फॅट दही खाल्ल्यानेही फायदा होतो. त्यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. याच्या नियमित सेवनाने हृदयाची गती बरोबर राहते. फॅटी फिशचाही आहारात समावेश करता येतो.
हिरव्या पालेभाज्या : हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश नेहमी करावा. यामध्ये सर्व प्रकारची पोषक तत्वे असतात. लोह, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी जे हृदयरोग कमी करण्यास मदत करतात. हे सर्व खाल्ल्याने ऑक्सिजनयुक्त रक्त तुमच्या हृदयापर्यंत सहज पोहोचते. ते रक्तवाहिन्या उघडण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात. यासाठी तुम्ही पालक, हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोलीचा आहारात समावेश करू शकता. यामुळे हृदयरोग कमी करता येतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/2eA4Zwm Tips : बदलत्या ऋतूत बॅक्टेरिया किडनीला नुकसान पोहोचवू शकतात; टाळायचे असल्यास 'हे' उपाय करा
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : 'हे' 5 पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी वरदान; हृदयविकाराचा धोकाही होईल कमी, वाचा सविस्तरhttps://ift.tt/ldo65zB