Advertisement

Health Tips : आजच्या काळात मोबाईल हा जीवनाचा अत्यावश्यक भाग बनला आहे. प्रत्येकाला झोपताना मोबाईल बाजूला लागतो. इतकंच नाही तर, जेवताना, झोपताना, अंघोळ करताना, फिरताना मोबाईल ही लोकांची गरज बनली आहे. यामुळेच बहुतेक लोक मानसिक आरोग्याबाबत चिंतेत असतात. सकाळी उठल्यावर बरेच लोक सर्वात आधी आपला मोबाईल चेक करतात. अनेकजणं तर बेडवर तासन्तास मोबाईल (Mobile) वापरतात. तुम्हालाही ही सवय असेल तर तुमची ही सवय सुधारणं गरजेचं आहे. कारण ते तुमच्या आरोग्यासाठी (Health) अजिबात योग्य नाही.

आजकाल लोक मोबाईल जवळ किंवा उशीवर ठेवून झोपतात. यामुळे खूप नुकसान होऊ शकते. कारण मोबाईलमधून रेडिएशन बाहेर पडतात, ज्यामुळे कॅन्सरसह अनेक घातक आजार होण्याची शक्यता असते. सकाळी सर्वात आधी मोबाईल वापरण्याची चूक का करू नये हे या ठिकाणी आपण जाणून घेऊयात.

सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल का वापरू नये?

तणाव वाढतो : 8-9 तासांची झोप घेतल्यानंतरही अनेकांना सकाळी तणाव जाणवतो आणि झोप पूर्ण झाली तरी असे का होते? असा प्रश्न पडतो. खरंतर यामागे तुमचा मोबाईल कारणीभूत आहे. जेव्हा तुम्ही सकाळी मोबाईल उघडता तेव्हा त्यात अशा अनेक गोष्टी असतात, ज्या तुम्हाला चिंता किंवा तणावात टाकतात. यामुळे, नकारात्मकता वाढू लागते, ज्यामुळे तुम्हाला तणाव जाणवतो.

उत्पादकता कमी होणे : झोपताना मोबाईल समोर ठेवल्यामुळे तुम्हाला फ्रेश असूनही काम करावेसे वाटत नाही. सतत थकल्यासारखे वाटेल. तुम्हाला सक्रिय वाटत नाही आणि त्यामुळे तुमची उत्पादकता आणखी कमी होऊ लागते. सकाळी उठून मोबाईल वापरल्यामुळे हे सगळे प्रकार घडतात.

मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो : जेव्हा तुम्ही सकाळी उठून मोबाईल वापरता तेव्हा अनेक वेळा तुम्हाला काही नकारात्मक मेसेज वाचायला मिळतात, ज्यामुळे तुमचा मूड खराब होतो आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

डोकेदुखीचा त्रास होतो : ही समस्या अनेक लोकांमध्ये दिसून येते. सकाळी उठून तासन्तास मोबाईल वापरल्याने डोकेदुखी आणि जडपणा येऊ शकतो. त्यामुळे तुम्हीही मोबाईल सकाळी उठल्या उठल्या मोबाईल बघत असाल तर ही सवय आजच कमी करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/2eA4Zwm Tips : बदलत्या ऋतूत बॅक्टेरिया किडनीला नुकसान पोहोचवू शकतात; टाळायचे असल्यास 'हे' उपाय करा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : तुम्हीसुद्धा सकाळी सर्वात आधी तुमचा मोबाईल चेक करता का? वेळीच ही सवय बदला, अन्यथा...https://ift.tt/ldo65zB
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : तुम्हीसुद्धा सकाळी सर्वात आधी तुमचा मोबाईल चेक करता का? वेळीच ही सवय बदला, अन्यथा...https://ift.tt/ldo65zB