Advertisement

Health Tips : चुकीचा आहार आणि बिघडलेली जीवनशैलीमुळे आजकाल लोक किडनीच्या (Kidney) समस्येने त्रस्त आहेत. किडनीमध्ये स्टोन (Stone) तयार होऊ लागतात. याची वेदना इतकी तीव्र असते की व्यक्तीला ती सहन करणे कठीण होते. किडनीमध्ये खडे निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत. जसे आजकाल आपण कमी पाणी पितो. तर, काही लोक असे पदार्थ खातात ज्यामध्ये कॅल्शियम ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हळूहळू स्फटिक तयार होऊ लागतात. आता अशा स्थितीत ग्रीन टी (Green Tea) आणि लेमन टी (Lemon Tea) प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका वाढतो का? असा प्रश्न काहींना पडतो. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ग्रीन टी आणि लेमन टीमुळे स्टोन होऊ शकतो?

खरंतर आजकाल लोक निरोगी जीवनशैली पाळण्यासाठी ग्रीन टी आणि लेमन टी पितात. कारण ते चयापचय वाढवते. यामुळे पचनक्रिया बरोबर राहते. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवतात. यामुळे लोक दुधाच्या चहाऐवजी लेमन टी आणि ग्रीन टी पिण्यास प्राधान्य देतात. मात्र, कुठेतरी तुम्ही याचे अति प्रमाणात सेवन केले तर त्यामुळे तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्यांमध्ये किडनी स्टोनचाही समावेश होतो. ग्रीन टी किंवा ब्लॅक टीचं व्यसन असलेले लोक दिवसातून अनेक वेळा त्याचे सेवन करतात. त्यामुळे शरीरातील ऑक्सलेटची पातळी वाढू शकते. ग्रीन टीमध्ये ऑक्सलेट नावाचे एन्झाईम असते जे किडनी स्टोनसाठी कारणीभूत ठरू शकते.

लेमन टी आरोग्यासाठी गुणकारी की घातक?

जर आपण लेमन टीबद्दल बोललो, तर त्यात व्हिटॅमिन सी असते, जे ऑक्सलेट तयार करण्यासाठी तुटते. त्यामुळे कॅल्शियम वाढू लागते. कॅल्शियमचे प्रमाण वाढल्याने शरीरात किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते. यामुळे यकृत, संधिवात यांसारख्या आजारांचाही धोका वाढतो. जर तुम्हाला आधीच किडनी स्टोनची समस्या असेल तर तुम्ही त्याचा वापर टाळावा. तुम्हाला अस्वस्थता किंवा वेदना जाणवल्यास लगेच तज्ञाचा सल्ला घ्या.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/YWMuNP7 Tips : बदलत्या ऋतूत बॅक्टेरिया किडनीला नुकसान पोहोचवू शकतात; टाळायचे असल्यास 'हे' उपाय करा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : तुम्हीही या दोन प्रकारचा चहा घेता का? वेळीच सावध व्हा; होऊ शकतो किडनी स्टोनचा धोकाhttps://ift.tt/ldo65zB
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : तुम्हीही या दोन प्रकारचा चहा घेता का? वेळीच सावध व्हा; होऊ शकतो किडनी स्टोनचा धोकाhttps://ift.tt/ldo65zB