Advertisement
हवामानातील बदलामुळे आर्द्रता वाढली आहे. त्यामुळेच डासांची उत्पत्ती होण्याची संधी मिळते. पावसाळ्यात डेंग्यू, चिकुनगुनियासह अनेक आजारांचा धोका वाढतो. पावसाळ्यात होणा-या आजारांपासून तुम्ही स्वतःला कसे सुरक्षित ठेवू शकता ते जाणून घेऊयात.
पावसाळ्यातील होणारे आजार आणि ते कसे टाळावेत?
डेंग्यू : डेंग्यू हा आजार डासांच्या चावण्याने पसरतो. पावसाळ्यात या आजाराचा धोका वाढतो. डेंग्यूने ग्रस्त असलेल्या व्यक्तीमध्ये सौम्य आणि गंभीर दोन्ही लक्षणे दिसू शकतात. तीव्र ताप, अंगदुखी, पुरळ उठणे, डोकेदुखी, सांधेदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश होतो. डेंग्यूच्या काही केसेसमध्ये रुग्णाची प्रकृती इतकी गंभीर होते की त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो. डेंग्यू टाळण्यासाठी, आपण डासांच्या संपर्कात येणे टाळणे सर्वात महत्वाचे आहे. यासाठी खबरदारी म्हणून पूर्ण बाह्यांचे कपडे घाला आणि मच्छर प्रतिबंधक क्रीम वापरा. घराभोवती पाणी साचू देऊ नका. घराच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या.
चिकुनगुनिया : पावसाळ्यातही चिकुचनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. हा रोग देखील डेंग्यू पसरवणाऱ्या डासांच्याच प्रजातीमुळे पसरतो. त्याची लक्षणे ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी इ. असतात. हा आजार टाळण्यासाठी, आपण पूर्ण हातांचे कपडे घालावे. घराभोवती पाणी साचण्यापासून थांबवावे. डासांना घरात जाण्यापासून थांबवा. संध्याकाळी दारे आणि खिडक्या बंद ठेवा.
मलेरिया : मलेरिया हा देखील पावसाळ्यातील एक आजार आहे, जो डासांमुळे पसरतो. त्याच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि स्नायू दुखणे यांचा समावेश होतो. मलेरिया टाळण्यासाठी रात्री मच्छरदाणी लावून झोपावे. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.
लेप्टोस्पायरोसिस : लेप्टोस्पायरोसिस हा एक जिवाणू संसर्ग आहे, जो संक्रमित प्राण्यांच्या मूत्राने दूषित पाणी, माती किंवा अन्न यांच्या संपर्कातून मानवांमध्ये पसरतो. उलट्या, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि ताप ही त्याची काही लक्षणे आहेत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/APH74tl Tips : बदलत्या ऋतूत बॅक्टेरिया किडनीला नुकसान पोहोचवू शकतात; टाळायचे असल्यास 'हे' उपाय करा
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : पावसाळ्यात वाढतो 'या' आजारांचा धोका; जाणून घ्या स्वतःचा बचाव कसा कराल?https://ift.tt/OFw4inb
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : पावसाळ्यात वाढतो 'या' आजारांचा धोका; जाणून घ्या स्वतःचा बचाव कसा कराल?https://ift.tt/OFw4inb