Advertisement

Iron Food : मानवी जीवनासाठी रक्त फार महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराला जर रक्त कमी पडले तर आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रक्ताची ताकद ही लोहावर अवलंबून असते. ज्यामुळे हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिन नावाच्या प्रथिनांची पातळी तयार होते. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

लोहाच्या कमतरतेची लक्षणे : आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शरीरात लोहाची कमतरता जाणवणे म्हणजे हे अशक्तपणाचे पहिले कारण आहे. याचं कारण म्हणजे जेव्हा हिमोग्लोबिन कमी होते तेव्हा संपूर्ण शरीरात ऑक्सिजन योग्य प्रकारे पोहोचत नाही. त्याच वेळी, मायोग्लोबिनच्या कमतरतेमुळे, स्नायूंच्या ऊतींचे ऑक्सिजन देखील नाहीसे होऊ लागते.

या खनिजाच्या कमतरतेमुळे तुमच्या मेंदूचा विकासही कमी होऊ शकतो. या समस्यांचा धोका कोणत्याही वयात होऊ शकतो. लहान मुले, गर्भधारणा आणि मासिक पाळी सुरू असलेल्या स्त्रिया आणि किडनी डायलिसीस करत असलेल्या लोकांनी या संदर्भात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

कॉफी आणि ऍपल सायडर व्हिनेगर

वैद्यकीय पोषणतज्ञांनी सांगितल्याप्रमाणे कॉफी आणि सफरचंद सायडर व्हिनेगरसारखे पदार्थ लोहाची पातळी कमी करू शकतात. याला आयुर्वेदात विदाही आहार म्हणून ओळखले जाते. अशा पदार्थांमुळे छातीत जळजळ होते.

'या' पदार्थांचं सेवन करू शकता

नैसर्गिकरीत्या लोहाची पातळी वाढवण्यासाठी तुम्ही आवळ्याचं सेवन करू शकता. आवळा तुम्ही ज्यूस, पावडर किंवा मुरांबा अशा कोणत्याही स्वरूपात खाऊ शकता. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेला हा आवळा आम्ल निर्मिती, अकाली वृद्धत्व, कर्करोग, हृदयविकार टाळण्यास मदत करते.

सुकं आलं

आल्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. सुक्या आल्यामध्ये अनेक दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. वात आणि कफ दोष यांचे सेवन केल्याने समतोल साधता येतो.

काळे मनुके

काळे मनुके हे एक उत्कृष्ट ड्राय फ्रूट आहे. हे अनेक पोषक तत्वांची कमतरता नैसर्गिक पद्धतीने पूर्ण करते. हे खाल्ल्याने फायबर, पोटॅशियम, सोडियम, प्रोटीन, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम शरीराला मिळतात.

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी या अतिशय पौष्टिक पालेभाज्या मानल्या जातात. कारण, हिरव्या पालेभाज्यांमध्ये पोषण फार असतं. हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने शरीरातील लोह वाढू शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/APH74tl Tips : बदलत्या ऋतूत बॅक्टेरिया किडनीला नुकसान पोहोचवू शकतात; टाळायचे असल्यास 'हे' उपाय करा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात दिसतात 'हे' बदल; वेळीच सावध व्हा, अन्यथा...https://ift.tt/OFw4inb
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात दिसतात 'हे' बदल; वेळीच सावध व्हा, अन्यथा...https://ift.tt/OFw4inb