Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २२ जुलै, २०२३, जुलै २२, २०२३ WIB
Last Updated 2023-07-21T23:48:30Z
careerLifeStyleResults

Health Tips : वजन कमी करण्यापासून ते मधुमेह नियंत्रित करण्यापर्यंत 'ही' आहेत फायबरयुक्त फळं; आजच आहारात समावेश करा

Advertisement

Fiber Rich Foods : जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि तुमची पचनक्रिया मजबूत करायची असेल तर तुम्ही तुमच्या आहारात फायबरचा समावेश करावा. फायबर अनेक पदार्थांमध्ये आढळते. फायबर दोन प्रकारचे असते. याच्या मदतीने आतड्याचे आरोग्य तर निरोगी राहतेच पण त्वचाही सुधारते. फायबर रिच फूड्सचे फायदे कोणते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

फायबर समृध्द अन्नाचे फायदे

कोलेस्ट्रॉल कमी करते : फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. याबरोबरच हृदयाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

वजन कमी करण्यात मदत : उच्च फायबर असलेले अन्न शरीरातील पचन मंद करण्यास मदत करतात. त्यामुळे जास्त वेळ भूक लागत नाही त्यामुळे वजन वाढत नाही.

बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते : फायबर पाचन तंत्राला चालना देण्यास मदत करते आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही फायबर युक्त अन्न खावे.

रक्तातील साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त : जास्त फायबर असलेले अन्न पचायला शरीराला वेळ लागतो. त्यामुळे रक्तात ग्लुकोज लवकर मिसळत नाही आणि रक्तातील साखरेचा धोका कमी होतो. फायबरयुक्त पदार्थ शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

फायबर समृध्द फळं

ओट्स : जर तुम्हाला फायबर समृद्ध काहीतरी खायचे असेल तर ओट्स हा एक चांगला पर्याय असू शकतो. त्यात भरपूर फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे आरोग्य चांगले राहते. ओट्समध्ये विरघळणारे फायबर रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. दुधासोबत ओट्स खाणे अधिक फायदेशीर आहे. ओट्स खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि जास्त वेळ भूक लागत नाही.

नाशपाती : नाशपातीमध्ये अनेक पौष्टिक घटक आढळतात. यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. कमी उष्मांक, उच्च पाण्याचे प्रमाण आणि फायबर असलेले नाशपाती वजन कमी करण्यासाठी चांगले मानले जातात.

दुधीभोपळा : दुधीभोपळा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. ही कमी कॅलरी फळभाजी आहे, ज्यामध्ये भरपूर पाणी देखील असते. याच्या सेवनाने शरीरातील पाणी टिकून राहण्याची आणि सूज येण्याची समस्या दूर होते.

एवोकॅडो : एवोकॅडोमध्ये हेल्दी फॅट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय, हे व्हिटॅमिन सी, ई, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्सची कमतरता पूर्ण करण्यास मदत करते. हे खाल्ल्याने हृदयाच्या समस्या कमी होतात. एका संशोधनानुसार, हेल्दी फायबर युक्त अन्नाचे सेवन वजन कमी करण्यास मदत करते.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : वजन कमी करण्यापासून ते मधुमेह नियंत्रित करण्यापर्यंत 'ही' आहेत फायबरयुक्त फळं; आजच आहारात समावेश कराhttps://ift.tt/MAluZ63