Advertisement

Almond Vs Peanuts: उत्तम आरोग्यासाठी योग्य जीवनशैलीसोबतच योग्य आहाराचीही (<a href="https://ift.tt/EZqTxge Diet) गरज असते. संतुलित आहार अनेक आजारांपासून तुमचं रक्षण करतो. यामुळेच लोक आहारात नट्सचा समावेश करतात. काहींना बदाम (<a href="https://ift.tt/Bvuo7JI) खायला आवडतात, तर काहींना शेंगदाणे (Peanuts) खायला आवडतात. दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, परंतु लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की, बदाम आणि शेंगदाण्यांमध्ये अधिक फायदेशीर काय ठरेल? तर दोघांपैकी सर्वोत्तम काय आहे? हे जाणून घेऊया.

शेंगदाणे की बदाम? काय ठरेल जास्त फायदेशीर?

बदामाच्या पोषक तत्वांबद्दल बोलायचं झालं तर त्यात भरपूर फायबर असतं. याशिवाय यामध्ये प्रथिनं, व्हिटॅमिन ई, कॉपर, फॉस्फरससह मॅग्नेशियम देखील आहे. दुसरीकडे, शेंगदाण्यांबद्दल बोलायचं झाल्यास, त्यात व्हिटॅमिन बी, थायामिन, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन बी-9, अँटीऑक्सिडंट्ससह अनेक खनिजे असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

जर तुम्ही मूठभर बदाम आणि शेंगदाणे समान प्रमाणात घेतले तर भाजलेल्या बदामामध्ये सुमारे 170 कॅलरीज, सुमारे 6 ग्रॅम प्रथिने आणि 3 ग्रॅम फायबर असतात. तर शेंगदाण्यामध्ये सुमारे 166 कॅलरीज, सुमारे 7 ग्रॅम प्रथिने आणि सुमारे 2 ग्रॅम फायबर असतात. यावरून हे समजते की व्हिटॅमिन बीच्या बाबतीत शेंगदाणे अधिक चांगले आहेत. तर व्हिटॅमिन ईसाठी बदाम हा एक चांगला पर्याय आहे. शेंगदाणे आणि बदाम दोन्ही आरोग्यासाठी चांगले आहेत. शेंगदाण्यांमध्ये बदामापेक्षा जास्त प्रोटिन्स असतात.

बदाम आणि शेंगदाण्यांपैकी कधी काय खाणं राहील योग्य?

बदाम आणि शेंगदाणे या दोन्हींमध्ये व्हिटॅमिन ई असतं. जर तुम्हाला व्हिटॅमिन ईचं प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही बदाम खावेत.

दुसरीकडे, जर तुम्हाला फोलेट आणि नियासिन सारख्या बी व्हिटॅमिनचा पुरवठा करायचा असेल, तर तुमच्यासाठी शेंगदाणे खाणं योग्य ठरेल, कारण त्यात बी जीवनसत्त्वांचं प्रमाण जास्त आहे.

मॅग्नेशियमच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, बदाम हे शेंगदाण्यांपेक्षा चांगले आहेत. तुम्ही शेंगदाण्यापेक्षा बदामांमधून जास्त मॅग्नेशियम घेऊ शकता.

लोह आणि कॅल्शियमसाठी बदाम खाणं चांगलं राहील, कारण हे दोन्ही घटक शेंगदाण्यांपेक्षा 2 पट चांगले आहेत.

झिंकच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, दोन्ही नट्स समान आहेत.

फॅट्सबद्दल बोलायचं झालं तर, या दोघांमध्ये फारसा फरक नाही. हृदयाच्या आरोग्यासाठी तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही एक खाऊ शकता.

अनसॅच्युरेटेड चरबीमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी असतो.

बदामाच्या तुलनेत शेंगदाण्यांच्या ऍलर्जीमुळे लोकांना त्रास होऊ शकतो. तर बदामात कमी ऍलर्जी असते. अशाप्रकारे, तुमच्या आरोग्याच्या गरजेनुसार बदाम किंवा शेंगदाणे तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरतील.

टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/0pITaeA Tips: मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पती गुणकारक; लवकरच दिसेल फरक

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips: बदाम की शेंगदाणे... काय खाणं ठरेल अधिक फायदेशीर? जाणून घ्या, तज्ज्ञांचं मतhttps://ift.tt/TfX1n8Z
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips: बदाम की शेंगदाणे... काय खाणं ठरेल अधिक फायदेशीर? जाणून घ्या, तज्ज्ञांचं मतhttps://ift.tt/TfX1n8Z