Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २९ जुलै, २०२३, जुलै २९, २०२३ WIB
Last Updated 2023-07-29T02:49:56Z
careerLifeStyleResults

Muharram 2023 : मोहर्रम महिन्यात मुस्लिम बांधव का व्यक्त करतात शोक? काय आहे मोहर्रमचा इतिहास

Advertisement

Muharram 2023 : मोहर्रम' हा इस्लामिक कालगणनेतील पहिला महिना आहे. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हुसेन हे करबला येथे शहीद झाले होते. हजरत इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ, लोक मोहर्रमच्या 10 व्या दिवशी शोक व्यक्त करतात. मोहर्रमच्या दहाव्या दिवसाला आशुरा असे म्हणतात.

मोहर्रम इतिहास...

मोहर्रम हा इस्लाम धर्माचा मुख्य दिवस आहे. हजरत इमाम हुसेन मोहरम महिन्यात शहीद झाले. मुस्लिम समाजातील लोकांसाठी हा सर्वात दुःखाचा दिवस मानला जातो. हजरत इमाम हुसेन हे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मुहम्मद यांचे धाकटे नातू होते. हजरत इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ, लोक मोहरमचा 10 वा दिवस शोक करतात. याला आशुरा म्हणतात.

भारतात मुस्लिम बांधवांमध्ये बहुसंख्य लोक हे सुन्नी समुदायातील आहेत. आशुराच्या दिवशी शोक व्यक्त करण्यामध्ये या समुदायात मागील काही वर्षांपासून दोन गट पडलेले पाहायला मिळतात. हजरत हुसेन शहीद झाल्याने काही जण दुखवटा साजरा करतात. तर व्यक्ती शहीद होणे ही गौरवाची बाब असून अशा शहीदचा दुखवटा साजरा करू नये असं मानणारा दुसरा गट देखील आहे.

भारतात अल्पसंख्येने असलेले शिया मुस्लिम मात्र या दिवशी मातम करतात. हजरत हुसेन यांना शहीद होताना ज्या वेदना सहन कराव्या लागल्या त्याची जाणीव स्वतःला देखील व्हावी यासाठी शिया मुस्लिम बांधव स्वतःला जखमी करून घेतात.

आशुराच्या दिनी मुस्लिम बांधव ठेवतात रोजा

रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा अर्थात उपवास करतात याची माहिती आपल्याला आहे. मात्र मोहर्रम महिन्यात देखील मुस्लिम बांधव उपवास अर्थात रोजा करतात. मोहर्रम महिन्याच्या 9 आणि 10 तारखेला मुस्लिम बांधव रोजा करतात. इस्लामचे प्रेषित हजरत मुसा यांना फिरओनच्या जुल्मी राजवटीतून मोहरमच्या 10 तारखेला मुक्ती मिळाली होती. या बद्दल अल्लाह प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुस्लिम बांधव मोहरमच्या 9 आणि 10 तारखेला रोजा करत असतात.

इस्लामच्या मान्यतेनुसार, सुमारे 1400 वर्षांपूर्वी आशुराच्या दिवशी करबलाच्या युद्धात इमाम हुसैन यांचा शिरच्छेद करण्यात आला होता. तेव्हापासून त्यांच्या स्मरणार्थ या दिवशी मिरवणूक आणि ताजिया काढण्याची परंपरा आहे. ज्या ठिकाणी हजरत इमाम हुसेन यांची कबर आहे, त्याच ठिकाणी ताजिया तयार करून मिरवणुका काढल्या जातात, असे सांगितले जाते. या दरम्यान मिरवणुकीत सहभागी लोक काळे कपडे परिधान करतात. आशुरा दिवशी, तैमुरी परंपरेचे पालन करणारे मुस्लिम रोजा-नमाजसह ताजी-आखाड्यांना पुरून किंवा थंड करून शोक करतात.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/3m0cie4 Days in July 2023 : 'महाराष्ट्र कृषी दिन', 'गुरुपौर्णिमा', 'मोहरम'सह एप्रिल महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Muharram 2023 : मोहर्रम महिन्यात मुस्लिम बांधव का व्यक्त करतात शोक? काय आहे मोहर्रमचा इतिहासhttps://ift.tt/e7HksAo