Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २९ जुलै, २०२३, जुलै २९, २०२३ WIB
Last Updated 2023-07-29T07:49:19Z
careerLifeStyleResults

sugary drinks : साखरयुक्त शीतपेयांवर कर आकारल्यास आरोग्यात सुधारणा, महसूलातही वाढ; ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांचं महत्त्वपूर्ण संशोधन

Advertisement

Taxing sugary drinks : ऑस्ट्रेलियातील (Australian) तीन विद्यापीठांनी महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे. साखरयुक्त शीतपेयांवर कर आकारल्यास आरोग्यात सुधारणा होऊ शकते. तसेच देशाची लाखो डॉलर्सची बचत होईल, असा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे. साखरयुक्त पेयांवर कर लावल्याने ऑस्ट्रेलियातील दंत आरोग्यावर मोठा सकारात्मक परिणाम होईल असं अभ्यासकांनी म्हटलंय. डीकिन विद्यापीठासह मेलबर्न विद्यापीठ आणि मोनाश विद्यापीठाच्या संशोधकांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे.

साखरयुक्त पेयांवर कर आकारल्यास दातांचे आरोग्य सुधारु शकते असे अभ्यासकांनी म्हटलं आहे. दात किडण्यापासून वाचवता येतील असेही त्यांनी म्हटलंय. साखरयुक्त पेयांवर जर 20 टक्के ऑस्ट्रेलियन कर आकारला तर 500000 पेक्षा जास्त दंत पोकळी रोखू शकतो. .यातून पुढच्या 10 वर्षांमध्ये आरोग्यात सुधारणा होऊ शकते असं अभ्यासकांनी म्हटलं आहे. AMA (Australian Medical Association) चे अध्यक्ष प्रोफेसर स्टीव्ह रॉबसन म्हणाले की, आता साखरयुक्त पेयांवर कर आकारल्यास आरोग्य चांगला परिणाम होऊन सरकारच्या महसुलात वाढ होणार आहे.

50 हून अधिक देशांचा साखरयुक्त पेयांवर कर लागू

50 हून अधिक देशांनी साखरयुक्त गोड पेयांवर कर लागू केला आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की  कर आकारल्यामुळं साखरयुक्त पेयांच्या किंमती वाढल्या. त्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर या पेयांचा वापर कमी झाला. गरीब घरांमध्ये त्याचा वापर खूपच कमी झाला. यामुळं तोंडाचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत झाल्याचे अभ्यासक गुयेन यांनी म्हटलं आहे. या पेयांवर कर आकारल्यानं आरोग्य सुधारणेला प्रोत्साहन मिळत असल्याचे गुयेन म्हणाले.

जास्त प्रमाणात साखरेचा वापर केल्यास धोका

प्रत्येक ऑस्ट्रेलियन नागरिक दर आठवड्याला सरासरी सुमारे अर्धा किलो साखरेचा वापर करतात. हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटने सांगितलेल्या प्रमाणापेक्षा अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिवसाला जास्तीत जास्त 60 ग्रॅमच्या आसपास साखरेचा वापर करावा असं सांगितलं आहे. आहारात जास्त प्रमाणात साखरेचा वापर केल्यास हृदयविकाचा धोका वाढू शकतो. तसेच रक्तदाब वाढणे, डायबेटीज आणि दीर्घकाळ जळजळ होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, असं अभ्यासकांनी म्हटलं आहे. अति साखरेचं सेवन केल्यास लठ्ठपणा आणि जुनाट आजारांचा धोका वाढतो. साखरयुक्त पेयांमध्ये मोठ्या प्रमाणात मुक्त शर्करा असते. सॉफ्ट ड्रिंकच्या सरासरी 375 एमएल बॉटलमध्ये 8 ते 12 चमचे म्हणजे 33 ते 50 ग्रॅम साखर असते. यामध्ये जास्त प्रमाणात द्रव कॅलरीज असतात.

ऑस्ट्रेलियन मेडिकल असोसिएशन (AMA) च्या अंदाजानुसार, ऑस्ट्रेलियन दरवर्षी 2.4 अब्ज लिटरपेक्षा जास्त साखरयुक्त पेये वापरतात. 36 टक्के प्रौढ आणि 41 टक्के या पेयांचे सेवन करतात. नऊ टक्के प्रौढ आणि सात टक्के मुले दररोज साखरयुक्त पेयांचे सेवन करतात. ऑस्ट्रेलियामध्ये तरुण पुरुष सर्वात जास्त साखरयुक्त पेयांचे ग्राहक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/4qj08yN Tips : तुम्हालाही जास्त गोड पदार्थ खाण्याची सवय आहे? वेळीच सावध व्हा, 'या' आजारांना असू शकतं आमंत्रण

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: sugary drinks : साखरयुक्त शीतपेयांवर कर आकारल्यास आरोग्यात सुधारणा, महसूलातही वाढ; ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांचं महत्त्वपूर्ण संशोधनhttps://ift.tt/e7HksAo