Advertisement

<a href="https://ift.tt/oyPZNeq Majha Special Story : विठ्ठल मंदिर (Vitthal Temple) आराखडा 73 कोटी, पंढरपूर (Pandharpur) विकास आराखडा 2700 कोटी... या घोषणा करताना शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) थकत नसले तरी विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भाविक कधी पाय भाजत तर, कधी चिखलातून भिजत 30-30 तास दर्शन रांगेत त्रास सहन करत आता थकून गेले आहेत. मात्र, हे या कोणत्याच सरकारच्या मनात येत नाही हे लाखो वारकऱ्यांचे दुर्दैव आहे. वर्षाला जवळपास साडेतीन कोटी भाविकांना दर्शन देणाऱ्या विठुरायाच्या दर्शन रांगेत उभे राहणे ही वारकऱ्यांची सत्व परीक्षा असते. यात वृद्ध भाविकांसोबत महिला आणि लहान मुलानाही दर्शन रांगेत या यातना सोसाव्या लागतात. दिवस रात्र दर्शन रांगेत उभे राहून दर्शन घेणारा हा भाविक याबाबत कधीच तक्रार करीत नाही. मात्र आता भाविक देखील यावर बोलू लागले आहेत. अजून किती वर्षे आम्ही अशा यातना भोगून दर्शन घ्यायचे असा सवाल विठ्ठलभक्त करू लागले आहेत.

विठ्ठला कधी होणार तुझे सुखकर दर्शन?

भाविकांच्या सोयीचा विचार करणाऱ्या मंदिर समितीची मुदत संपून दोन वर्षे उलटून गेली आहेत. राज्यात जरी भाजप आणि ठाकरे सेना रोज एकमेकांच्या विरोधात टोकाची भाषा वापरात असली, तरी पंढरपूर मंदिर समितीत मात्र उद्धव सेना आणि भाजप गळ्यात गळे घालून असल्याचे चित्र असते. आपली समिती कधीही बरखास्त होणार यामुळे यांना भाविकांच्या सोयरसुतक नाही. त्यामुळे भाविक सध्या विठ्ठल भरोसेच आहेत. मंदिराचा व्यवस्थापक गेले सहा वर्षे एकाच जागेवर असल्याने सध्या त्यांची एकाधिकारशाहीमुळे प्रशासन आणि कर्मचारी देखील मंदिराचे राजे झाले आहेत. अशा परिस्थितीत बिचार्या गोरगरीब विठ्ठल भक्ताच्या सुविधांचा विचार करायला वेळ कोणाला आहे. अशी परिस्थिती बनली आहे. राज्यात सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवार असे दणकेबाज सरकार असताना भाविकांच्या व्यर्थच विचार करावा अशी वारकऱ्यांची अपेक्षा आहे .

कधी पाय भाजत तरी, कधी चिखलातून भिजून दर्शन

उन्हाळयात पाय भाजत दर्शन घ्याव्या लागणाऱ्या भाविकांना पावसाळ्यात चिखलातून आणि भिजत तासनतास दर्शन रांगेत उभे राहावे लागते. याबाबत 'एबीपी माझा'ने वेळोवेळी भाविकांची अवस्था दाखवल्यावर मुख्यमंत्र्यांना वारकऱ्यांची चौकशी करायला यावे लागले होते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी रोजच भाविकांची संख्या वाढत जाऊ लागल्याने तासनतास दर्शन रांगेत उभे राहण्याचा त्रास कमी होऊन सुखकर व्यवस्था व्हावी, अशी भाविकांची अपेक्षा आहे. तिरुपतीच्या धर्तीवर मोठं मोठे हॉल बांधून छताखाली भाविकांची दर्शन रांग आणल्यास कितीही तास उभे राहावे लागले तरी भाविकांना याचा त्रास कमी जाणवेल, अशी भाविकांची मागणी आहे.

वारकऱ्यांच्या यातना केव्हा संपणार?

वर्षानुवर्षे आम्ही हे सहन करत आलोय, पण सरकारने आतातरी लाखो भाविकांसाठी व्यवस्थेत बदल करावा अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. याबाबत पूर्वी मंदिर समितीने घोषणा देखील केली होती. भाविकांना कमीतकमी वेळ दर्शन रांगेत थांबावे यासाठी तिरुपती धर्तीवर काही पासेस देखील छापून घेतले होते. याच्या अनेक बातम्याही झाल्या, मात्र असे मोठे हॉल कुठे बांधायचे असा प्रश्न उभारल्यावर पुन्हा ही व्यवस्था बासनात गुंडाळून ठेवली गेली. व्हीआयपीच्या नावाखाली विठ्ठल मंदिरात दर्शनाचा बाजार सुरु असल्याचा आरोपही भाविक करीत असून दर्शन रांगेत होणाऱ्या या घुसखोरीमुळे आम्हाला तासनतास रांगेत थांबावे लागत असल्याच्या तक्रारी असतात. आता भाविक या दर्शन रांगेच्या व्यवस्थेवर आक्रमक होऊ लागले असून आषाढी यात्रेत दर्शन रांगेतील शेकडो नागरिकांनी अभूतपूर्व गोंधळ घातला होता.

सरकार वारकऱ्यांकडे केव्हा लक्ष देणार?

आषाढी दरम्यान याच रांगेत केवळ उपचार मिळू न शकल्याने एका भाविकाला आपला जीव देखील गमवावा लागला होता. किमान आतातरी शिंदे सरकारने जागे व्हावे आणि भाविकांचा शेकडो वर्षाचा त्रास संपवावा अशी मागणी भाविकांतून होत आहे. मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या समितीची तातडीने पुर्नरचना करून भाविकांच्या मागण्याचा विचार करणारी समिती नेमून शासनाने यात लक्ष घातल्यास वर्षानुवर्षे विठ्ठलभक्त भोगत असलेल्या यातना संपून त्यांना देवाचा सुखकर दर्शन घेता येईल.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Pandharpur : कधी पाय भाजत तरी, कधी चिखलात... बा विठ्ठला कधी होणार तुझे सुखकर दर्शन?https://ift.tt/e7HksAo
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Pandharpur : कधी पाय भाजत तरी, कधी चिखलात... बा विठ्ठला कधी होणार तुझे सुखकर दर्शन?https://ift.tt/e7HksAo