Advertisement

Health Tips : फुफ्फुस हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. शरीरात सर्वत्र ऑक्सिजन पोहोचवण्यात फुफ्फुसाची भूमिका महत्त्वाची असते. बिघडलेली जीवनशैली आणि प्रदूषणामुळे फुफ्फुसाचे आजार झपाट्याने वाढत आहेत. दमा, सीओपीडी, इन्फ्लुएंझा, न्यूमोनिया, टीबी, संसर्ग, फुफ्फुसाचा कर्करोग अशा अनेक श्वसनाच्या समस्यांचा धोका वाढतोय.

हे आजार कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतात, परंतु नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे फुफ्फुसांशी संबंधित आजारांचा धोका जास्त असतो. याचा अर्थ असा की, व्हिटॅमिन-के पुरेशा प्रमाणात घेतल्यास फुफ्फुसे निरोगी होऊ शकतात.

'व्हिटॅमिन के' शरीरासाठी उपयुक्त

ईआरजे ओपन रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यास अहवालानुसार, जेव्हा रक्तात व्हिटॅमिन-के कमी होते, तेव्हा फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. यामुळे, दमा, सीओपीडी म्हणजेच क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज सारख्या समस्या वाढू शकतात. व्हिटॅमिन-केच्या कमतरतेमुळे फुफ्फुसे आजारी पडू शकतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. तसेच, फुफ्फुसांना निरोगी ठेवणारे व्हिटॅमिन K मध्ये नेमकं काय आहे याचा पुरेसा पुरावा नाही.

अभ्यास काय म्हणतो?

डॅनिश संशोधन संघाने हा अभ्यास 24 ते 77 वयोगटातील 4,092 लोकांवर केला. सर्व सहभागींची फुफ्फुसाची कार्यक्षमता चाचणी घेण्यात आली. यामध्ये केलेल्या रक्त चाचण्यांमध्ये व्हिटॅमिन के कमी असणाऱ्यांमध्ये हा आजार होण्याचा धोका अधिक असल्याचे सांगण्यात आले. या टीमचे प्रमुख डॉ. टॉर्किल जेस्पर्सन यांनी सांगितले की, रक्तामध्ये व्हिटॅमिन-केची भूमिका महत्त्वाची आहे. हृदय आणि हाडांसाठी ते फायदेशीर आहे. तसेच, व्हिटॅमिन-के आणि फुफ्फुसावर फार कमी संशोधन झाले आहे. परंतु हा अभ्यास सूचित करतो की फुफ्फुसांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटॅमिन के महत्त्वपूर्ण असू शकते.

व्हिटॅमिन के चे सेवन कसे करावे ?

स्वीडनच्या कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटचे डॉ. अपोस्टोलोस बॉसिओस म्हणतात की, या अभ्यासात असे आढळून आले आहे की, अशा लोकांच्या रक्तात व्हिटॅमिन-के कमी आढळून आले आहेत, त्यांच्या फुफ्फुसाचे नुकसान होण्याचा धोकाही जास्त आहे. तसेच, व्हिटॅमिन-के पूरक फुफ्फुसे निरोगी बनवू शकतात किंवा नाही याचा कोणताही पुरावा नाही. या कारणास्तव, हे जीवनसत्व किती प्रमाणात सेवन करावे यात कोणताही बदल झालेला नाही. मात्र, आहारात व्हिटॅमिन-के समाविष्ट करणे अधिक फायदेशीर आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/EHOkrGt Tips : तपासल्यावर मशीन प्रत्येक वेळी वेगवेगळे वजन दाखवते? जाणून घ्या वजन तपासण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : फुफ्फुसांना निरोगी ठेवायचंय? तर शरीरात 'या' व्हिटॅमिनची कमतरता होऊ देऊ नकाhttps://ift.tt/BLeXCWJ
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : फुफ्फुसांना निरोगी ठेवायचंय? तर शरीरात 'या' व्हिटॅमिनची कमतरता होऊ देऊ नकाhttps://ift.tt/BLeXCWJ