Advertisement

Shravan Somvar Vrat 2023 : श्रावण महिना सुरु झाला आहे आणि आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे. या निमित्ताने अनेक ठिकाणी शिवमंदिरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनाला अनोखे महत्व असते. देश विदेशात महादेवाचे अनेक रूपांची शेकडो पुरातन मंदिरे असून यात असेच एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर सांगोला तालुक्याच्या सीमेवर आहे.

हेमाडपंथी धोंडा महादेव मंदिराची कहाणी

सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर कटफळ येथे असणाऱ्या पुरातन हेमाडपंथी धोंडा महादेव मंदिर हे खऱ्या अर्थाने अनोखे मंदिर आहे. सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणारं येथील महादेव मंदिर पुत्रप्राप्तीसाठी प्रसिद्ध असल्याचे सांगितले जाते.

सम्राट अशोकाच्या काळातील या पुरातन आणि जागृत पंचमुखी महादेव मंदिराचे अस्तित्व असल्याचे ताम्रपट उपलब्ध आहेत. मात्र हे मंदिर त्याही पूर्वी म्हणजे पांडवकालीन असल्याचे उल्लेख नवनाथ ग्रंथात दिसून येतात. पांडवांची माता कुंती हिने या ठिकाणी महादेवाची उपासना केल्याचे उल्लेख या पुरातन ग्रंथात असून या महादेवाच्या उपासनेस कुंतीला पुत्रलाभ झाल्याची आख्यायिका या ग्रंथात सापडते. या गावच्या दक्षिणेस सम्राट अशोक राजाच्या कालखंडातील हेमाडपंथी पद्धतीचे संपूर्ण दगडी बांधकाम असलेले महादेव मंदिर आहे. या मंदिरात अत्यंत देखणे स्वयंभू तसेच संपूर्ण भारतातील एकमेव असे पंचमुखी शिवलिंग अत्यंत सुबक नक्षी असलेले आहे. या पिंडीवर मुख्य शिवलिंगाबरोबर चार भुजा असून याला पंच महाभूतांचे प्रतीक मानले जाते. एकाच शिवलिंगावर पाच पिंडी असलेल्या या अनोख्या शिवलिंगाच्या समोर चक्क दक्षिणमुखी मारुतीचे पुरातन मंदिर आहे. त्यामुळे या मंदिराला दक्षिणेतील रामेश्वर असेही संबोधले जाते. देवालयाचा बाहेरचा छत दगडी खांबावर उभा असून या दगडावर सुंदर असे नक्षीकाम आहे. तर देवळाच्या बाहेर मोठ्या दगडात नंदी विराजमान आहे. या मंदिरात सर्व दगडी खांबावर कोरीव काम केले असून त्यात गणपती नागफणी अशा विविध देवदेवतांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. मंदिरात स्वतंत्र गाभार आहे त्यात स्वयंभू पिंड आहे. औरंगजेबाच्या काळात खवासखानाने या मंदिरावर हल्ला करून तोडफोड केल्यावर छत्रपतींच्या सैन्याने याच परिसरात खवासखानाची हत्या केल्याचा इतिहास देखील सांगितला जातो. या मंदिराचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन होळकर संस्थानाने या मंदिराला 130 एकर जमीन दान दिली आहे. सध्या या देवालयाची पूजाअर्चा करण्याचा मान डॉ. मारूती पुजारी, डॉ. धनंजय पुजारी, सदाशिव पुजारी हे करत आहेत. गेल्या चौदा पिढ्यांपासून हेच पुजारी कुटुंब या अनोख्या धोंडा महादेव मंदिराची व्यवस्था पाहत आहेत.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Shravan Somvar Vrat 2023 : पाच पिंडी असणाऱ्या अनोख्या महादेव मंदिराची कहाणी, कुंतीने येथे केली होती पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्याhttps://ift.tt/UcuZ9pb
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Shravan Somvar Vrat 2023 : पाच पिंडी असणाऱ्या अनोख्या महादेव मंदिराची कहाणी, कुंतीने येथे केली होती पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्याhttps://ift.tt/UcuZ9pb