Advertisement

Audi Q8 Facelift Unveiled : जर्मन ऑटोमेकर कंपनी ऑडीने म्युनिक मोटर शोमध्ये आपली अपडेटेड कार Q8 सादर केली आहे. 2018 मध्ये Q8 नंतर हे पहिले अपडेट मॉडेल आहे. मात्र, त्यात फारसा बदल झालेला नाही. नवीन Q8 मागील वर्षी सादर केलेल्या Q8 ई-ट्रॉनपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. कारची आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत ती जाणून घेऊयात.

ऑडी Q8 डिझाईन

Audi Q8 च्या स्टाईलमध्ये हेडलाईट्स, बंपर अपडेटेड आहे. या फेसलिफ्टमधील सर्वात मोठा बदल म्हणजे नवीन हेडलाईट्स, ज्यामध्ये आता एक्स्ट्रा एचडी मॅट्रिक्स एलईडी युनिट्स आहेत. या हेडलाईट युनिटमध्ये डिजिटल डेटाईम रनिंग लाईट्स आणि मल्टीपल लाईट मोड आणि 24 LEDs आणि हाय पॉवर लेझरची वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये एक नवीन 2D लोगो देखील देण्यात आला आहे. कारच्या मागचं प्रोफाईल पूर्वीसारखेच आहे. पण आता चार स्लॉटेड लाईट डिझाईनसह डिजिटल OLED रिअर लाईट आहे.

इंटीरिअर डिझाईन आणि वैशिष्ट्ये

नवीन Q8 कारचा इंटर्नल भाग जवळपास पूर्वीसारखाच आहे. Q8 ला आता अंगभूत Spotify आणि Amazon Music सारख्या अॅप्ससह विस्तारित अॅप स्टोअर मिळतात. या अपडेट्समधून, ड्रायव्हर असिस्ट सिस्टममध्ये देखील सुधारणा करण्यात आली आहे. ऑडीच्या व्हर्च्युअल कॉकपिटमधील 360-डिग्री कॅमेरा आता पूर्ण HD मध्ये आहे. बाकी सर्व काही पूर्वीसारखेच आहे, म्हणजे Q8 मध्ये ऑडीची ट्विन MMI टचस्क्रीन, चार-झोन क्लायमेट कंट्रोल, एक हेड-अप डिस्प्ले, सीट हीटिंग, वेंटिलेशन ओलुफसेन हाय-फाय सिस्टम यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. यात 4WD आणि पर्यायी एअर स्प्रिंग्स देखील आहेत.

ऑडी Q8 इंजिन आणि गिअरबॉक्स

यात पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्याय आहेत, 3.0-लिटर 45 TDI V6 डिझेल इंजिन 231hp/ 500Nm आउटपुट जनरेट करते. तर 3.0-लिटर 55 TFSI V6 पेट्रोल 340hp आणि 500Nm चे आउटपुट जनरेट करते. दोन्ही इंजिन 8-स्पीड टिपट्रॉनिक ऑटोमॅटिक, क्वाट्रो फोर-व्हील ड्राइव्ह आणि लाईट-हायब्रिड प्रणालीसह उपलब्ध आहेत.

स्पोर्टियर SQ8 ला 4.0-लिटर V8 इंजिन मिळते, जे 507hp आणि 770Nm आउटपुट जनरेट करते आणि 8-स्पीड टिपट्रॉनिक ऑटो आणि क्वाट्रो फोर-व्हील ड्राइव्हशी जोडलेले आहे. SUV ला टॉर्क वेक्टरिंग स्पोर्ट डिफरेंशियल आणि इलेक्ट्रोमेकॅनिकल अॅक्टिव्ह रोल बारसह कॉन्फिगर केले जाऊ शकते जे 48-व्होल्ट सुपर कॅपेसिटरला जोडलेले आहे.

भारतात ऑडी Q8 किंमत किती?

ऑडीचे भारतात नवीन मॉडेल लवकरच येण्याची शक्यता आहे. भारतातील सध्याच्या Q8 ची एक्स-शोरूम किंमत 1.07 कोटी ते 1.43 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. फेसलिफ्ट मॉडेलची किंमत थोडी जास्त असू शकते. मर्सिडीज-बेंझ GLE आणि BMW X6 सारख्या कारशी त्याची स्पर्धा करणा आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/MmtHshS Astor Blackstorm Edition कार भारतात लाँच; दमदार इंजिन आणि आकर्षक लूकसह मिळतील 'ही' वैशिष्ट्य

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Audi Q8 Facelift : ऑडीने Q8 फेसलिफ्ट SUV मॉडेल सादर; जाणून घ्या काय आहेत लेटेस्ट अपडेटhttps://ift.tt/dWagcOv
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Audi Q8 Facelift : ऑडीने Q8 फेसलिफ्ट SUV मॉडेल सादर; जाणून घ्या काय आहेत लेटेस्ट अपडेटhttps://ift.tt/dWagcOv