Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३, सप्टेंबर ०७, २०२३ WIB
Last Updated 2023-09-07T07:49:24Z
careerLifeStyleResults

National Nutrition Week 2023 : शारीरिक तंदुरूस्तीसाठी व्हे प्रोटीन गरजेचं; वाचा याचे आश्चर्यकारक 6 फायदे

Advertisement

National Nutrition Week 2023 : सध्या देशभरात 'राष्ट्रीय पोषण सप्ताह' सुरु आहे आणि आज या सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. या निमित्त शारीरिक तंदुरूस्तीसाठी महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊयात. शरीराला तंदुरुस्त आणि निरोगी बनवण्यात प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रथिने केवळ वजन राखण्यासाठी आवश्यक नसून त्याच्या सेवनाने स्नायू तयार होण्यासही मदत होते. प्रथिनांसाठी बहुतेक लोक सोया, चिकन, अंडी, दूध, चीज आणि नट्स यांचा आहाराचा भाग बनवतात, परंतु गेल्या काही वर्षांत व्हे प्रोटीन पावडरची मागणीही लक्षणीय वाढली आहे. बॉडी बिल्डिंग करणारे आणि जिममध्ये जाणारे लोक व्हे प्रोटीनचा वापर करतात. व्हे प्रोटीन हा एक प्रकारचा सप्लिमेंट आहे जो खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि नवीन स्नायू तयार होतात. प्रथिनांची गरज आपल्या आहारात समाविष्ट करून सहज भागवली जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया प्रोटीनचे फायदे आणि त्याचे सेवन कसे करावे.

व्हे प्रोटीन म्हणजे काय ?

दुधात दोन प्रकारची प्रथिने आढळतात, कॅसिन आणि व्हे प्रोटीन. व्हे प्रोटीन दुधापासून वेगळे केले जाऊ शकते. चीज बरोबर जे उपपदार्थ बाहेर पडतात त्याला व्हे प्रोटीन म्हणतात. याला सामान्य भाषेत ताक असेही म्हणतात. व्हे प्रोटीन हे शुद्ध प्रोटीन मानले जाते कारण त्यात सर्व 9 आवश्यक अमीनो ऍसिड असतात. ज्या लोकांना त्यांचे शरीर घट्ट आणि मजबूत बनवायचे आहे त्यांनी व्हे प्रोटीनचे नियमित सेवन करावे. व्हे प्रोटीन पावडरचा आहारात पाणी, दूध, दही आणि इतर अनेक गोष्टींमध्ये समावेश केला जाऊ शकतो. यामध्ये असलेले घटक स्नायू आणि शरीराचा विकास करण्यास मदत करतात.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रथिने हे सर्वात महत्वाचे पोषक तत्व आहे. व्हे प्रोटीनमध्ये असलेले घटक व्यक्तीला अनेक आजारांपासून वाचवून शरीराला बळकट करण्यात मदत करतात. व्हे प्रोटीनचे अनेक फायदे आहेत जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

वजन नियंत्रित ठेवण्यास मदत

असे मानले जाते की, वजन वाढवण्यासाठी आणि स्नायू वाढवण्यासाठी व्हे प्रोटीनचा वापर केला जातो. पण असे नाही कारण वजन कमी करण्यासाठी शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिनांचीही गरज असते, जे आपल्याला व्हे प्रोटीनमधून मिळू शकते. व्हे प्रोटीनचे नियमित सेवन केल्याने भूक कमी होते आणि लालसा टाळता येते. मात्र, प्रथिनांचे सेवन करण्यासोबतच नियमित व्यायाम करणेही महत्त्वाचे आहे.

मधुमेहामध्ये फायदेशीर

मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात दह्यातील प्रथिनांचा समावेश करावा. व्हे प्रोटीन इन्सुलिन सक्रिय करण्याचे काम करते आणि रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहामुळे होणारे स्नायूंचे नुकसानही नियंत्रणात ठेवता येते. मधुमेहाच्या रुग्णांना व्हे प्रोटीन घेण्याबरोबरच शारीरिक हालचालींवर लक्ष केंद्रित करावे लागते.

प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत

व्हे प्रोटीनमध्ये मुबलक प्रमाणात अमिनो अॅसिड सिस्टीन असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. हे ग्लूटाथिओनची पातळी वाढवते जे एक प्रकारचे अँटिऑक्सिडेंट आहे. ग्लूटाथिओन रोग आणि संक्रमणांशी लढण्यास मदत करते.

निरोगी हृदयासाठी फायदेशीर

हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्हे प्रोटीनचे सेवन देखील केले जाऊ शकते. हृदयाशी संबंधित आजार बरे करण्यासाठी व्हे प्रोटीन उपयुक्त मानले जाते. यामध्ये ल्युटीन असते जे हृदयरोग कमी करण्यास मदत करते. याच्या नियमित सेवनाने हृदय मजबूत होऊ शकते.

स्नायू मजबूत करण्यासाठी

कमकुवत झालेले स्नायू  मजबूत करण्यासाठी प्रोटीनची भूमिका महत्त्वाची मानली जाते. विशेषत: खेळाडूंनी पुरेसे प्रथिने घेतले पाहिजेत. व्हे प्रोटीनचा वापर स्नायूंच्या वाढीसाठी केला जाऊ शकतो. हे एक अतिशय फायदेशीर पूरक आहे.

हाडे मजबूत होतात

व्हे प्रोटीनमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. दूध, केळी आणि अंडी व्यतिरिक्त व्हे प्रोटीनचे सेवन करून तुम्ही शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करू शकता.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: National Nutrition Week 2023 : शारीरिक तंदुरूस्तीसाठी व्हे प्रोटीन गरजेचं; वाचा याचे आश्चर्यकारक 6 फायदेhttps://ift.tt/dWagcOv