Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३, सप्टेंबर ०५, २०२३ WIB
Last Updated 2023-09-05T06:00:56Z
Rojgar

Career In Geography: भौगोलिक क्षेत्राशी निगडीत विषयात करिअर करायचे आहे? या क्षेत्रात नोकरीचे टेंशन नाही

Advertisement
‘भूगोल’ म्हणजे पृथ्वी आणि त्याच्या वातावरणाच्या भौतिक वैशिष्ट्यांचा अभ्यास. यामध्ये मानवी लोकसंख्या, संसाधनांचे वितरण, राजकीय आणि आर्थिक क्रियाकलापांचा अभ्यास यांचा समावेश आहे, कारण या गोष्टी पृथ्वी आणि त्याच्या वातावरणाच्या भौतिक वैशिष्ट्यांवर परिणाम घडवितात. भूगोलचा उच्च अभ्यास पृथ्वीतील विविध भौतिक पोत, मानवी समाजातील पोत आणि संस्कृती शोधण्याची संधी देतो. भूगोल हा बर्‍यापैकी व्यापक विषय आहे. त्यामुळे त्यात करिअरची शक्यताही बरीच जास्त आहे. वाहतूक, एअरलाइट रूट आणि शिपिंग मार्ग नियोजन, कार्टोग्राफी, उपग्रह तंत्रज्ञान, लोकसंख्या परिषद, हवामान विभाग, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण विज्ञान, शिक्षण, नागरी सेवा इत्यादी क्षेत्रात नोकर्‍या मिळू शकतात. भौगोलिक क्षेत्रात व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षण घेतलेले लोक रिमोट सेन्सिंग, नकाशा, अन्न सुरक्षा, जैवविविधता संवर्धन इत्यादी संबंधित संस्थांमध्ये काम करून देखील चांगले पैसे कमवू शकतात.

source https://maharashtratimes.com/career/career-news/want-to-pursue-a-career-in-geography-no-job-tension-in-this-field/articleshow/103363956.cms