Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३, सप्टेंबर ०५, २०२३ WIB
Last Updated 2023-09-05T06:50:24Z
careerLifeStyleResults

Janmashtami 2023 : यंदा कृष्ण जन्माष्टमी 6 की 7 सप्टेंबरला? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त, आणि महत्त्व

Advertisement

Janmashtami 2023 : श्रीकृष्ण जन्माष्टमीची (Krishna Janmashtami 2023) तयारी जोरात सुरू आहे. यानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. जन्माष्टमीचे व्रत केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात, अशी धारणा आहे. यंदा जन्माष्टमी दोन दिवस साजरी होणार आहे. जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त, आणि महत्त्व

जाणून घ्या, जन्माष्टमीचे व्रत कधी करता येईल?

श्रीमद् भागवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता भाद्र कृष्ण अष्टमी तिथी, बुधवार, मध्यरात्री रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीत झाला. वैदिक दिनदर्शिकेनुसार भाद्रपदाची अष्टमी तिथी बुधवार, 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजून 37 मिनिटांनी सुरू होत आहे. अष्टमी तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी गुरुवार, 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजून 14 मिनिटांनी समाप्त होईल. ज्योतिषांच्या मते, शास्त्रानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त 6 सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. तर दुसरीकडे वैष्णव पंथात 7 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार, यावेळी श्रीकृष्णाची 5250 वी जन्माष्टमी साजरी केली जाईल. शुभ मुहूर्तावर बालगोपाळाची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होतात असा लोकांमध्ये विश्वास आहे. मथुरेतही जन्माष्टमी 6 सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे.

जन्माष्टमी 2023 शुभ मुहूर्त

जन्माष्टमी तिथी : बुधवार, 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 03:37 वाजता सुरू होईल
अष्टमी तिथी : 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 04:14 वाजता समाप्त होईल
जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त : 12:02 ते दुपारी 12:48 पर्यंत असेल.

जन्माष्टमी पूजा पद्धती आणि उपवासाचे नियम

जन्माष्टमी व्रताच्या एक दिवस आधी म्हणजेच सप्तमीच्या दिवशी फक्त हलके आणि सात्विक अन्नच खावे.

व्रताच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून सर्व देवतांना नमस्कार करावा.

नंतर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसा.

यानंतर हातात पाणी, फळे आणि फुले घेऊन व्रताचा संकल्प करावा.

देवघरात एक सुंदर चौरंग पसरवून त्यावर कलश बसवा.

भगवान श्रीकृष्ण आणि माता देवकी यांची मूर्ती किंवा सुंदर चित्राची स्थापना करा.

देवकी, वासुदेव, बलदेव, नंदा, यशोदा आणि लक्ष्मी यांची नावे घेऊन त्यांची पूजा करा.

हे व्रत रात्री 12 वाजल्यानंतरच सोडले जाते. या व्रतामध्ये धान्य वापरले जात नाही.

उपवासाच्या फराळाच्या स्वरूपात तुम्ही मावा बर्फी, शिंगाड्याच्या पिठाची खीर किंवा फळे खाऊ शकता.

पूजेची पद्धत

या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे परिधान करावेत. यासोबतच आज सकाळी हातात गंगाजल घेऊन व्रताचा संकल्प करावा. जन्माष्टमीला दिवसभर भगवान श्रीकृष्णाचे कीर्तन करण्याची परंपरा आहे. या दिवशी श्रीकृष्णासोबत सर्व देवांना नवीन वस्त्रे परिधान केली जातात. या दिवशी शाळीग्रामला पंचामृताने अभिषेक केला जातो. यासोबतच देवाला खव्याचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केल्याने संतती सुख मिळते. यासोबतच घरात समृद्धी राहते. तर दुसरीकडे, अशी धारणा आहे की, जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. म्हणूनच एक दिवस आधी तुळशीची पाने तोडून घ्या. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जेवणात लसूण आणि कांद्याचे सेवन करू नये. अन्यथा उपवास मोडू शकतो

जन्माष्टमी कधी शुभ असते?

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते. पहिल्याच दिवशी मध्यरात्री अष्टमी आली तर पहिल्या दिवशी जन्माष्टमीचा उपवास केला जातो. यासोबतच जन्माष्टमीच्या पूजेसाठी रात्रीची वेळ आणि रोहिणी नक्षत्रही मानले जाते. अशा परिस्थितीत 6 सप्टेंबर 2023 रोजी जन्माष्टमी व्रत आणि पूजा करणे शुभ राहील.

2023 मध्ये जन्माष्टमीची सुट्टी कधी आहे?

यंदा जन्माष्टमीचा सण 6 आणि 7 सप्टेंबर या दोन्ही दिवशी साजरा केला जाणार आहे. अशा परिस्थितीत, बहुतेक शहरांमध्ये जन्माष्टमीची सुट्टी 6 सप्टेंबर 2023 रोजी आहे, सुट्टीची तारीख विविध शहरानुसार भिन्न असू शकते.

मथुरेत जन्माष्टमी 2023 कधी आहे?

6 सप्टेंबर 2023 रोजी श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेत जन्माष्टमी साजरी केली जाईल. जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Janmashtami 2023 : यंदा कृष्ण जन्माष्टमी 6 की 7 सप्टेंबरला? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त, आणि महत्त्वhttps://ift.tt/aKoLswN