Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३, सप्टेंबर १९, २०२३ WIB
Last Updated 2023-09-19T10:51:17Z
careerLifeStyleResults

Hair Care Tips : केस लांब, काळे आणि घनदाट हवे असतील; तर मेथीच्या दाण्यांचा 'असा' वापर करा

Advertisement

Hair Care Tips : प्रत्येक मुलीला लांब, काळे आणि घनदाट केस हवे असतात आणि त्यासाठी त्या अनेक प्रकारच्या केसांच्या उत्पादनांचा वापर करतात. अनेक वेळा काही उत्पादनांच्या वापरामुळे केस गळायला लागतात. यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. त्याऐवजी जर तुम्ही घरगुती पद्धतीने उपचार केले तर तुम्हाला त्याचे नुकसानही होणार नाही आणि त्याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येईल. याशिवाय तुमचे केस खराब होण्यापासूनही वाचतील. आज आम्ही तुम्हाला केसांसाठी मेथीच्या दाण्यांच्या वापराविषयी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला काळे, घनदाट आणि लांब केस मिळतील.

मेथीचे दाणे केसांना लावल्याने फायदे होतात

मेथीचे दाणे तुमच्या केसांसाठी फार फायदेशीर असतात. यामध्ये असलेले प्रोटीन आणि निकोटिनिक अॅसिड केसांना आतून पोषण देण्यास मदत करतात. याशिवाय यामध्ये लेसिथिन देखील आढळते, जे केसांना मजबूत करते आणि ते मुलायम देखील बनवते. मेथीचे दाणे केसांना लावल्याने केस गळण्याची समस्याही दूर होते.

मेथीचे दाणे केसांना लावल्याने कोंड्याची समस्याही दूर होते. मेथीच्या दाण्यांमध्ये अँटीफंगल गुणधर्म आढळतात, ज्यामुळे केसांमध्ये बुरशीजन्य संसर्ग होण्यास प्रतिबंध होतो.

केसांवर मेथीचे दाणे कसे वापराल?

मेथीची पेस्ट

केसांसाठी मेथीचे दाणे तुम्ही तीन प्रकारे वापरू शकता. सर्वप्रथम तुम्ही पेस्टप्रमाणे लावू शकता. यासाठी मेथीचे दाणे काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर पेस्ट बनवा. आता ही पेस्ट शॅम्पू करण्यापूर्वी 30 मिनिटे लावा आणि नंतर आपले डोके कोमट पाण्याने धुवा.

मेथीचे दाणे आणि खोबरेल तेल

तुम्ही तुमच्या नारळाच्या तेलात मेथीचे दाणे मिक्स करू शकता. यासाठी सर्वप्रथम नारळाच्या तेलात 1-2 चमचे मेथीचे दाणे टाकून गरम करा. तेल थंड झाल्यावर डोक्याला लावून किमान तासभर तसंच राहू द्या.

मेथीचे दाणे आणि दही

मेथीचे दाणे आणि दही यांचा वापर केसांसाठीही खूप चांगला मानला जातो. यासाठी मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी त्याची पेस्ट बनवा. आता दोन चमचे मेथीच्या दाण्यांची पेस्ट दोन चमचे दह्यात मिसळा आणि डोक्याला नीट लावा. कमीतकमी 40-45 मिनिटे ठेवा आणि नंतर आपले केस धुवा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/CpbHuVs Tips : मनःशांतीसाठी 'या' 4 गोष्टींपासून दूर राहा; स्वतःवर प्रेम असेल तर 'या' गोष्टी कोणत्याही किंमतीत करू नका

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Hair Care Tips : केस लांब, काळे आणि घनदाट हवे असतील; तर मेथीच्या दाण्यांचा 'असा' वापर कराhttps://ift.tt/LjqkBla