Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३, सप्टेंबर १९, २०२३ WIB
Last Updated 2023-09-19T12:49:09Z
careerLifeStyleResults

Health Tips : महिलांमध्ये कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी पपई गुणकारी; 'या' गोष्टींचे सेवन देखील फायदेशीर

Advertisement

Health Tips : कर्करोग हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार मानला जातो. कर्करोग हा असा आजार आहे जो सर्व वयोगटातील लोकांना होऊ शकतो. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गर्भाशयाच्या मुखाचा आणि स्तनाचा कर्करोग ही महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारी प्रकरणे आहेत. यामुळे दरवर्षी लाखो मृत्यू होतात. आनुवंशिकते बरोबरच जीवनशैली आणि आहारातील बदल यामुळे त्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढला आहे. कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी, योग्य लाईफस्टाईल आणि आहार पाळणे आवश्यक आहे. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी कर्करोगविरोधी आहार फायदेशीर ठरू शकतो.

संशोधकांना असे आढळून आले की काही फळांमध्ये कर्करोगाचा धोका कमी करणारे घटक असतात. पपईवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले की हे एक फळ असू शकते जे महिलांचे आरोग्य सुधारते आणि काही प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण करते.

पपई कर्करोगाचा धोका कमी करू शकते.

संशोधकांना असे आढळून आले की, पपईमध्ये लाइकोपीन समृद्ध आहे. एक प्रकारचा अँटिऑक्सिडेंट जो गर्भाशयाच्या मुखाचा आणि स्तनाच्या कर्करोगाच्या जोखमीपासून संरक्षण करतो असे मानले जाते. पपई व्यतिरिक्त, गाजर, टोमॅटो आणि टरबूजमध्ये देखील असते. हृदयविकारापासून संरक्षण आणि कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करण्यासाठी या फळाचे सेवन फायदेशीर ठरू शकते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सर्व महिलांनी आपल्या आहारात पपईचा समावेश करावा.

संत्री खाण्याचे फायदे

सायट्रिक फळ असल्याने संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे एक असं फळ आहे जे थायामिन, फोलेट आणि पोटॅशियम सारख्या इतर महत्वाच्या पोषक तत्वांचा पुरवठा करते. व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वपूर्ण मानले जाते जे तुमचे कर्करोगापासून संरक्षण करू शकते.

द्राक्षांचे अँटिऑक्सिडंट प्रभाव

कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही द्राक्षांचाही समावेश करू शकता. हे फळ अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. द्राक्षांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी, प्रोव्हिटामिन ए आणि पोटॅशियमचे प्रमाण शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवू शकते. याव्यतिरिक्त, लाइकोपीन एक कॅरोटीनॉइड आहे ज्यामध्ये शक्तिशाली कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत. काही संशोधनांनी असे सुचवले आहे की, कर्करोगावर उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी ते विशेषतः फायदेशीर ठरू शकते.

सफरचंदचे प्रभावी गुणधर्म

सफरचंद हे केवळ सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक नाही. सफरचंदामध्ये फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी मिळते, जे सर्व कॅन्सरपासून तुमचे संरक्षण करण्यास मदत करू शकतात. सफरचंदात आढळणारे फायबर आतड्यांच्या हालचालींना प्रोत्साहन देते आणि तुमची पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : महिलांमध्ये कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी पपई गुणकारी; 'या' गोष्टींचे सेवन देखील फायदेशीरhttps://ift.tt/LjqkBla