Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३, सप्टेंबर २९, २०२३ WIB
Last Updated 2023-09-29T05:50:53Z
careerLifeStyleResults
Health Tips : 'या' आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना सकाळी जाणवतो तीव्र खोकला; दिवस सरताच दिसतात लक्षणं
Advertisement
Health Tips : आपल्या आजूबाजूला, कुटुंबात आपण असे अनेक लोक पाहिले आहेत ज्यांना सकाळी खूप खोकला <a href="https://ift.tt/jRe6uJX> येतो. आणि जसजसा दिवस पुढे जातो तसतसा त्यांचा खोकला कमी होऊ लागतो. काही लोकांना हा त्रास वर्षानुवर्ष असतो. काहींचा हा त्रास हवामानातील बदलामुळे बरा होतो. मात्र, हे जाणून घेणं गरजेचं आहे की, हा एक सामान्य रोग आहे ज्याची ही काही सामान्य लक्षणे आहेत. या आजारात हवा फुफ्फुसात गेल्यावर संसर्ग सुरू होतो. किंवा हवेच्या संपर्कात येताच हा रोग सुरू होतो. त्यामुळे घसा खवखवतो आणि नंतर ऍलर्जीमुळे घशात खाज सुटणे आणि खोकला सुरू होतो. त्यामुळे सकाळी होताच खोकला तीव्र होतो. चला जाणून घेऊया या आजाराची लक्षणे नेमकी कोणती आहेत?
'या' 4 रोगांमुळे तीव्र खोकला होतो
क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज-सीओपीडी 
'क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज'मध्ये थंड हवा फुफ्फुसात गेल्यानंतर श्वसनमार्ग आकुंचन पावू लागतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. सकाळची हवा थंड असते आणि त्यामुळे फुफ्फुसाचे आजार होतात. अशा वेळी कार्बन डायऑक्साईड बाहेर पडू शकत नाही आणि शरीरातच राहतो. यामध्ये फुफ्फुसात ऑक्सिजनची कमतरता भासते. त्यामुळे त्या व्यक्तीला खूप जोरात खोकला येऊ लागतो. छातीत घरघर होते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. 
दमा
दम्यामध्ये, सकाळी खूप खोकला होतो. वायू प्रदूषण आणि थंड हवामानामुळे फुफ्फुसाचा त्रास होऊ शकतो. फुफ्फुसात ऍलर्जी निर्माण होऊ लागते आणि त्यामुळे खोकला सुरू होतो. दम्याच्या रुग्णाच्या श्वसनमार्गामध्ये सूज आणि चिडचिड सुरू होते. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागतो. श्वसनमार्ग आकुंचन पावू लागतो आणि व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो, त्यामुळे खूप जोरात खोकला येतो. 
ब्राँकायटिस
ब्राँकायटिसने त्रस्त असलेल्या रुग्णाच्या श्वसनमार्गाला सूज येऊ लागते. सकाळी, थंड हवा फुफ्फुसात जाताच, घशात तीव्र खोकला सुरू होतो. घशात सूज आणि बॅक्टेरिया तयार होऊ लागतात ज्यामुळे रोग सुरू होतो. 
GERD
GERD Gastroesophageal reflux disease (GERD) हा पचनसंस्थेशी संबंधित आजार आहे. या आजारात छातीत जळजळ आणि आंबट ढेकर येऊ लागतात. यामध्ये फुफ्फुस आणि घशात सूज येऊ लागते. या आजारात सकाळी खोकलाही सुरू होतो. 
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/eq27gNd Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : 'या' आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना सकाळी जाणवतो तीव्र खोकला; दिवस सरताच दिसतात लक्षणंhttps://ift.tt/dzlTv0D