Advertisement

Health Tips : अंडी (Egg) हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. अंड्यांमध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड आढळतात. अंड्याचे रोज योग्य सेवन केल्यास त्याचे अनेक फायदे होतात. पण तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी अंड्यांबरोबर खाऊ नयेत. यामुळे आरोग्याला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी अंड्याबरोबर खाऊ नयेत.

अंडी आणि चहा-कॉफी

जेव्हा तुम्ही अंडी खाता तेव्हा त्यासोबत चहा किंवा कॉफी यांसारख्या कॅफिन असलेल्या गोष्टींचे सेवन करू नका, अन्यथा पचन बिघडू शकते. एवढेच नाही तर कॅफिन असलेले पदार्थ किंवा पेय अंड्यातील पोषक तत्वे शोषून घेतात. त्यामुळे त्याची क्षमता कमी होऊ शकते. यामुळे पोटदुखी होऊ शकते आणि शरीरात पोषक तत्वांची कमतरता देखील होऊ शकते.

अंडी आणि केळी

अंडी आणि केळी हे दोन्ही पोषक तत्वांचा खजिना आहेत. या दोन्हीचे सेवन केल्याने आरोग्याला खूप फायदा होतो. अंडी आणि केळी एकत्र कधीही खाऊ नयेत हे फार कमी लोकांना माहिती आहे. यामुळे तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. यासाठी एक ते दोन तासांच्या अंतराने अंडी किंवा केळी खाण्याचा सल्ला दिला जातो.

अंडी आणि मिठाई

अंड्यांसोबत मिठाई कोणीही खात नाही, पण हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की जर जास्त साखरेचे पदार्थ अंड्यांसोबत खाल्ले तर ते पोटाला नुकसान पोहोचवू शकते. दोघांमध्ये किमान एक तासाचे अंतर असावे.

अंडी आणि सोया प्रोडक्ट्स

अंड्यांव्यतिरिक्त, सोयाबीन आणि सोया प्रोडक्ट्समध्ये उच्च प्रथिने आढळतात परंतु दोन्ही एकत्र न खाण्याचा सल्ला दिला जातो. अंडी आणि सोया प्रोडक्ट्स एकत्र खाल्ल्याने शरीरात जास्त प्रमाणात प्रथिने पोहोचतात आणि त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/eq27gNd Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : अंड्याबरोबर काय खावं आणि काय खाऊ नये? वेळीच जाणून घ्या, अन्यथा...https://ift.tt/dzlTv0D
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : अंड्याबरोबर काय खावं आणि काय खाऊ नये? वेळीच जाणून घ्या, अन्यथा...https://ift.tt/dzlTv0D