Advertisement

Health Tips : पावसाळा संपून हळूहळू थंडीचे दिवस सुरु होत आहेत. या बदलत्या हवामानात घसा खवखवणे (Sore Throat) आणि घसा दुखणे यांसारख्या समस्या सामान्य आहेत. या दरम्यान लोकांना सर्दी आणि घशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. पण आज आपण अशा लोकांबद्दल बोलणार आहोत ज्यांना वर्षभर घसा दुखणे आणि घसा खवखवणे ही समस्या प्रामुख्याने सकाळी जाणवते. आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर तुम्हाला वारंवार घसा दुखणे आणि घसादुखीचा त्रास होत असेल तर ही छोटीशी बाब समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका, तर त्यावर वेळीच उपचार करा.

घसादुखीशिवाय 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

श्वास घेण्यास त्रास होणे

ब्रिटीश न्यूजपेपर द मिररच्या रिपोर्टनुसार, जर एखाद्या व्यक्तीचा सतत घसा दुखत असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. कारण ही फुफ्फुस आणि इतर फुफ्फुसांमध्ये संसर्गाशी संबंधित समस्या असू शकते. ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

खाण्यात अडचण होणे

तुम्हाला व्हायरल फ्लू किंवा सर्दी आहे आणि तुम्हाला खाण्यात किंवा गिळताना त्रास होत आहे. अनेकदा औषधं घेऊनही तुम्हाला फरक जाणवत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण हे धोकादायक लक्षण असू शकतात.

आवाज बदलणे

विषाणूजन्य सर्दी एक ते तीन दिवसात बरी होते. पण जर तुमचा घसा दुखत नसेल आणि तुमचा आवाज कर्कश असेल तर तुम्ही त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. त्यापेक्षा ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

घसा खवखवणे हलक्यात घेऊ नका

घसा खवखवणे हलक्यात घेऊ नका कारण ही परिस्थिती कधीही गंभीर होऊ शकते. याचाच अर्थ तुम्हाला तुम्ही काही वेळातच अशक्तपणा जाणवेल. त्यामुळे वेळीच सावध व्हा. जर तुम्हाला 2 किंवा 3 दिवसांपेक्षा जास्त वेळ घसा खवखवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. या लक्षणांकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर यातून अनेक गंभीर आजार निर्माण होऊ शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/ZCsiFaR Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : सकाळच्या वेळी अनेकदा घसा खवखवणे आणि वेदना होत असतील तर सावधान; 'ही' 4 लक्षणं दिसल्यास सतर्क व्हाhttps://ift.tt/0AcRHoL
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : सकाळच्या वेळी अनेकदा घसा खवखवणे आणि वेदना होत असतील तर सावधान; 'ही' 4 लक्षणं दिसल्यास सतर्क व्हाhttps://ift.tt/0AcRHoL