Advertisement

Navratri 2023 : जर तुम्ही नवरात्रीमध्ये <a href="https://ift.tt/HIs32fd 2023) नऊ दिवस उपवास केला असेल, परंतु वारंवार भूक लागल्याने तुम्ही दिवसभर काही ना काही खात असाल, तर तुमच्या उपवासाला काही अर्थ राहणार नाही. कारण यामुळे पचनसंस्थेच्या समस्याही होऊ शकतात. लठ्ठपणा वाढू शकतो. यासाठी शेंगदाण्याचा चाट तयार करून खा. ही अतिशय आरोग्यदायी पर्याय आहे.

देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी नवरात्री दरम्यान भक्त उपवास करतात. काही फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात, तर बरेच लोक संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात. असे मानले जाते की, उपवास केल्याने देवी प्रसन्न होते आणि आपली इच्छा पूर्ण करते. पण, हा उपवास इतका सोपा नसतो. एखाद्याला वारंवार भूक लागत राहते त्यामुळे वारंवार काहीतरी खावे लागते, अन्यथा अशक्तपणा, चक्कर येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. परंतु यामुळे वजन वाढण्याबरोबरच गॅस आणि अॅसिडिटीचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच एका रेसिपीबद्दल सांगणार आहोत, जी काही मिनिटांत तयार होते आणि पोटही बराच काळ भरलेले राहते. ही रेसिपी म्हणजे शेंगदाण्याचा चाट. हा कसा बनवायचा ते जाणून घ्या.

शेंगदाण्याचा चाट रेसिपी

साहित्य : कच्चे शेंगदाणे, टोमॅटो, जिरेपूड, कोथिंबीर, तूप, मीठ, चिरलेली काकडी, लिंबाचा रस.

शेंगदाण्याचा चाट बनवण्याची पद्धत

सर्वात आधी शेंगदाणे भाजून घ्या. किमान 6 ते 8 मिनिटे तव्यावर शेकवा. यानंतर थोडा वेळ थंड होऊ द्या. ते थंड झाल्यावर हाताने चोळून त्याची साले वेगळी करा.

कढईत थोडे तूप घाला. यानंतर थोडे जिरे, धनेपूड, थोडी काळी मिरी आणि नंतर भाजलेले शेंगदाणे घाला.

आता हे शेंगदाणे एका भांड्यात काढा. त्यात चिरलेला टोमॅटो, चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली काकडी, हिरवी मिरची, मीठ आणि लिंबाचा रस घाला.

तुमचा शेंगदाण्याचा चाट खाण्यासाठी तयार आहे.

शेंगदाण्याचा चाट खाण्याचे फायदे

हा चाट खाल्ल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे वजन लवकर वाढणार नाही.

शेंगदाण्यामध्ये फायबर देखील चांगले असते, ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.

शेंगदाण्यामध्ये असलेले चांगले फॅट खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

यामध्ये असलेल्या प्रोटीनचे प्रमाण शरीराला ऊर्जावान ठेवते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/ZCsiFaR Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Navratri 2023 : नवरात्रीत भूक नियंत्रित ठेवायची असेल तर घरच्या घरी बनवा शेंगदाण्याचा स्पेशल चार्ट; हेल्दीही आहे आणि टेस्टीहीhttps://ift.tt/0AcRHoL
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Navratri 2023 : नवरात्रीत भूक नियंत्रित ठेवायची असेल तर घरच्या घरी बनवा शेंगदाण्याचा स्पेशल चार्ट; हेल्दीही आहे आणि टेस्टीहीhttps://ift.tt/0AcRHoL