Advertisement

Health Tips : शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाणी फार गरजेचं आहे. पाणी हा आपल्या जीवनशैलीतील आहाराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. जर तुम्ही दररोज पुरेसे पाणी पीत नसाल आणि कितीही आरोग्यदायी आहार पाळला तरी तुमचे आरोग्य चांगले राहणार नाही. योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्याने त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतात.

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनची समस्या सुरू होते. याबरोबरच पाण्याच्या कमतरतेचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. जर तुम्ही आठवडाभर सतत रोज किमान 5 मोठे ग्लास पाणी प्यायलात तर तुमच्या शरीरात कोणते बदल होतात ते जाणून घेऊयात.

पोट निरोगी राहते

पोटाचे आजार असणाऱ्यांनी रोज पुरेसे पाणी प्यावे. जर तुमची पचनशक्ती बिघडली असेल, बद्धकोष्ठतेची समस्या असेल किंवा पोटाशी संबंधित कोणताही आजार असेल तर पाणी खूप फायदेशीर ठरू शकते. दररोज किमान 5 मोठे ग्लास पाणी पिण्यास सुरुवात करा.

विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते

शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे खूप महत्वाचे आहे. जर आपले शरीर विषारी पदार्थ काढून टाकू शकत नसेल तर त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बॉडी डिटॉक्स करणे खूप गरजेचे आहे. यासाठी पुरेसे पाणी प्यावे. रोज किमान 5 ग्लास पाणी प्या. काही दिवसांतच तुमचे शरीर योग्य प्रकारे डिटॉक्सिफिकेशन होईल.

मूत्रपिंड आणि यकृत

शरीराच्या प्रत्येक अवयवाला व्यवस्थित काम करण्यासाठी पाण्याची गरज असते. असे काही अवयव आहेत जे पाण्याअभावी लवकर खराब होऊ शकतात. जर तुम्ही पुरेसे पाणी प्यायले नाही तर यकृत आणि किडनीसारख्या अवयवांना इजा होते. पुरेसे पाणी प्यायल्याने आठवडाभरात त्याचा परिणाम तुमच्यावर दिसून येईल.

पाणी कमी प्यायल्यास 'या' समस्या जाणवतात

पाणी कमी प्यायल्याने तुम्हाला ड्राय माऊथची समस्या जाणवू शकते. तोंडामध्ये लाळेचे प्रमाण कमी होते. यामुळे बोलणे, गिळणे आणि श्वास घेणे देखील कठीण होऊ शकते. पाणी कमी प्यायल्याने स्किन डल होते. चेहऱ्यावरील तेज निघून जाते. पाणी कमी प्यायल्याने डोकेदुखी, चक्कर येणे इत्यादी समस्या देखील तुम्हाला जाणवू शकतात. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे सांधेदुखी देखील होऊ शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/6e5TKDE Tips : सर्दी आणि घसादुखीचा खूप त्रास होतोय? वेळीच वाफ घ्या अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : दररोज 5 ग्लास पाणी पिणं आरोग्यासाठी लाभदायक;' 'या' समस्यांपासून होईल सुटकाhttps://ift.tt/zZMTDct
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : दररोज 5 ग्लास पाणी पिणं आरोग्यासाठी लाभदायक;' 'या' समस्यांपासून होईल सुटकाhttps://ift.tt/zZMTDct