Advertisement

Health Tips : रुमाल आणि टिश्यू पेपर हे आपल्या रोजच्या जीवनातील एक गरजेचा भाग आहे. आपण कुठे जरी बाहेर गेलो, ऑफिसला निघालो तरी रूमाल आणि टिश्यू पेपर हे तुमच्या बरोबर असतातच. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, वारंवार वापरण्यात येणारा रुमाल किंवा टिश्यू यापैकी तुमच्यासाठी नेमका कोणता चांगला पर्याय आहे?

रुमाल आणि टिश्यू पेपर यांच्यामध्ये काय वापरणं चांगलं आहे याविषयी जर तुमचा गोंधळ असेल तर या ठिकाणी आम्ही तुमचा हाच गोंधळ दूर करणार आहोत.

सर्वात आधी जाणून घेऊयात की, रुमालाचा इतिहास नेमका काय आहे? खरंतर, पहिल्या शतकात, रोमन लोकांनी घाम पुसण्यासाठी किंवा तोंड आणि चेहरा झाकण्यासाठी सुडारियम (घाम पुसण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कापडाचे लॅटिन नाव) वापरले जायचे. मात्र, काळानुसार रुमाल वापरण्याची पद्धतही बदलली आहे.

कोणता रुमाल किंवा टिश्यू वापरायचा?

आजच्या काळात रुमाल आणि टिश्यू हे दोन्ही आपल्या मूलभूत गरजांचा एक भाग झाले आहेत. टिश्यू पेपरचे उत्पादन चीनमध्ये दुसऱ्या शतकात झाले असे मानले जाते. आज आपल्याला माहित असलेली टिश्यू मेकअप काढण्यासाठी आणि नाक पुसण्यासाठी तयार करण्यात आली होती.

संशोधन काय म्हणते?

मात्र, संशोधनात असे म्हटले आहे की, पुन्हा वापरता येण्याजोग्या सुती रुमालाने आपले नाक पुसणे किंवा इतर कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्यास विषाणू पसरण्याचा धोका असतो. तुम्ही तुमचा सूती रुमाल ताबडतोब वॉशमध्ये घातला तरीही त्यात अनेक जंतूंचं संक्रमण होते.

पण हवेतून पसरणारे जीवाणू टिश्यूवर इतके दिवस टिकू शकत नाहीत. तसेच, हे टिश्यू वापरल्यानंतर फेकून देखील दिले जातात. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की,- रुमाल श्वासोच्छवासातील एरोसोल प्रभावीपणे फिल्टर करत नाहीत, याचा अर्थ प्रदूषक आणि जंतू रुमालांमधून सहजपणे शरीरात प्रवेश करू शकतात.

टिश्यू पेपर हा एक चांगला पर्याय आहे!

अमेरिकन कंपनी इकोसिस्टम अॅनालिटिक्सने पुन्हा वापरता येण्याजोग्या सुती रुमालांची डिस्पोजेबल पेपर टिश्यूशी तुलना केली आहे. जर तुम्ही सुती रुमाल वापरण्यास तयार असाल तर तुम्ही सेंद्रिय कापूस निवडू शकता. मात्र, सेंद्रिय कापसाचे उत्पादन कमी आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला टिश्यूज वापरून बरं वाटत असेल तर, रिसायकल मटेरियल वापरून बनवलेल्या टिश्यूचाच वापर करा. टिश्यू डिस्पोजेबल असल्याने त्यापासून विषाणू पसरत नाहीत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/L9vjotY Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : रुमाल की टिश्यू पेपर? दोघांमध्ये तुमच्यासाठी काय फायदेशीर? जाणून घ्याhttps://ift.tt/N7wH4GC
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : रुमाल की टिश्यू पेपर? दोघांमध्ये तुमच्यासाठी काय फायदेशीर? जाणून घ्याhttps://ift.tt/N7wH4GC