Advertisement
मात्र, त्याची लक्षणे आधीच दिसू लागतात. या काळात आपल्या आहाराची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. शाकाहारी आहार रजोनिवृत्तीच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करू शकतो. त्याची लक्षणे काय आहेत आणि कोणते शाकाहारी पदार्थ तुम्हाला यात उपयोगी आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
रजोनिवृत्तीची लक्षणे
अनियमित मासिक पाळी
योनी कोरडेपणा
गरम फ्लॅश
स्वभावाच्या लहरी
कोरडी त्वचा
स्तनाच्या आकारात बदल
निद्रानाश
लैंगिक इच्छांमध्ये बदल
वजन वाढणे
कोणते शाकाहारी पदार्थ खावेत?
हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. ब्रोकोली, कोबी, पालक अशा भाज्यांचा आहारात समावेश तुम्ही करू शकता. तुमचे वजन कमी करण्याबरोबरच ते तुम्हाला सर्व आवश्यक घटक देखील पुरवतात.
दुग्ध प्रोडक्ट्स
रजोनिवृत्तीच्या काळात हाडांची घनता कमी होऊ लागते. याचे कारण म्हणजे इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे हाडांची घनता कमी होते. याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात, यामध्ये हाडे कमकुवत होतात. त्यामुळे आहारात कॅल्शियमची कमतरता होऊ देऊ नका. कॅल्शियमसाठी तुम्ही तुमच्या आहारात दूध, दही, चीज इत्यादींचा वापर करू शकता.
बदाम
बदामामध्ये मॅग्नेशियम, प्रोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. यामुळे तुमचे वजन तर कमी होतेच आणि तुमचे हाडे दोन्ही निरोगी राहतात. ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी करण्यासाठी मॅग्नेशियम खूप फायदेशीर आहे.
सोया प्रोडक्ट्स
सोया प्रोडक्ट्समध्ये भरपूर कॅल्शियम असते. याबरोबरच गरम पदार्थांना प्रतिबंध करण्यासाठीही हे फायदेशीर आहे. तुम्ही तुमच्या आहारात सोया दूध, सोयाबीन, सोया नट्स यांसारख्या सोया प्रो़डक्ट्सचा समावेश करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/L9vjotY Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: World Vegetarian Day 2023 : 'हे' पदार्थ रजोनिवृत्तीच्या लक्षणांपासून आराम देतात; आजच या शाकाहारी पदार्थांचं सेवन कराhttps://ift.tt/N7wH4GC
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: World Vegetarian Day 2023 : 'हे' पदार्थ रजोनिवृत्तीच्या लक्षणांपासून आराम देतात; आजच या शाकाहारी पदार्थांचं सेवन कराhttps://ift.tt/N7wH4GC