Advertisement

Health Tips : शिमला मिरचीचा वापर अनेक भाज्यांमध्ये केला जातो. तसेच, याचा वापर पिझ्झा, नूडल्स आणि पास्तापर्यंतच्या अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. जेवणात शिमला मिरचीचा समावेश केल्याने जेवण चवदार तर बनतेच शिवाय ती रेसिपी देखील गार्निशिंग केल्यावर सुंदर दिसते. शिमला मिरचीचे वेगवेगळे रंग असतात. जसे की, हिरवा, लाल, पिवळा रंग. या वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या एकमेकांत मिसळून पदार्थाची शोभा आणखी वाढवतात. शिमला मिरचीच्या विविध प्रजातींमध्ये मौल्यवान पोषक तत्वे दडलेली असतात. जे आपले शरीर आतून मजबूत बनवते. हिरवी, लाल, पिवळी, केशरी आणि काळी शिमला मिरची, या सर्वांमध्ये असलेली जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स हे आपल्यासाठी वरदान आहेत.

सर्व रंगांच्या कॅप्सिकमचे स्वतःचे फायदे आहेत

पेपरिका - कॅप्सेसिन आणि कॅरोटीनॉइड्स असतात, जे त्यास रंग देतात. हे अँटिऑक्सिडंट्सचे काम करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

हिरवी शिमला मिरची - यामध्ये व्हिटॅमिन सी आणि क्लोरोफिल असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

पिवळी शिमला मिरची - यामध्ये कॅरोटीनॉइड असतात जे डोळ्यांसाठी फायदेशीर असतात आणि रेटिनाचे संरक्षण करतात.

ब्लॅक शिमला मिरची - यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात जे कॅन्सरशी लढण्यास मदत करतात.

ऑरेंज शिमला मिरची - या शिमला मिरचीमध्ये बीटा कॅरोटीन आढळते जे त्याला केशरी रंग देते. बीटा कॅरोटीन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. ते रेटिनाचे संरक्षण करते.

जाणून घ्या कोणती जास्त फायदेशीर आहे.

लाल शिमला मिरचीमध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी यांसारख्या फायटोन्यूट्रिएंट्सचे प्रमाण हिरव्या शिमला मिरची किंवा इतर शिमला मिरचीच्या तुलनेत खूप जास्त असते. लाल शिमला मिरचीमध्ये बीटा-कॅरोटीनचे प्रमाण हिरव्या शिमला मिरचीपेक्षा 11 पट जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे लाल शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण देखील हिरव्या मिरचीच्या तुलनेत दीड पट जास्त असते. तर, हिरव्या शिमला मिरचीमध्ये कमी साखर असते. त्यामुळे लाल शिमला मिरचीचे सेवन पोषक तत्वांसाठी अधिक फायदेशीर आहे. लाल शिमला मिरचीमध्ये बीटा-कॅरोटीनचे प्रमाण हिरव्या शिमला मिरचीपेक्षा 11 पट जास्त असल्याचे आढळून आले आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/JirYB1Q Care Tips : चेहऱ्यावरच्या ऑईली स्किनने हैराण आहात? मुलतानी मातीचा स्पेशल फेस पॅक आहे रामबाण उपाय; जाणून घ्या कसा बनवायचा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : हिरवी, लाल, पिवळी, नारिंगी की काळी शिमला मिरची? तुमच्यासाठी जास्त कोणती फायदेशीर? जाणून घ्याhttps://ift.tt/yjFLhgW
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : हिरवी, लाल, पिवळी, नारिंगी की काळी शिमला मिरची? तुमच्यासाठी जास्त कोणती फायदेशीर? जाणून घ्याhttps://ift.tt/yjFLhgW