Advertisement

Effects Of Not Drinking Enough Water: शरीरात पाण्याची कमतरता झाली तर अनेक प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात. शरीरात पाण्याची कमतरता झाली तर त्याचा रक्ताभिसरण, यकृत आणि किडनीवर परिणाम होतो. स्किन ड्राय होणे, बद्धकोष्ठता, डोकेदुखी आणि पाय दुखणे इत्यादी समस्या तुम्हाला पाणी कमी प्यायल्यानं जाणवू शकतात. दररोज किती ग्लास पाणी प्यावे? आणि पाणी कमी प्यायल्याने कोणते आजार होऊ शकतात? याबाबत जाणून घेऊयात...

पाणी कमी प्यायल्याने होऊ शकतात 'हे' आजार-

यूटीआय इंफेक्शन

पाणी हे शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवते. पाणी हे पीएच संतुलन राखण्यासोबतच शरीरातील धोकादायक बॅक्टेरिया देखील काढून टाकते. पाणी कमी प्यायल्यानं यूटीआय इंफेक्शन होऊ शकते.

लो बीपी

जेव्हा तुम्ही कमी पाणी प्याल, तेव्हा तुमच्या रक्ताभिसरणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे रक्त पंपिंगचा वेग कमी होतो. तुम्ही पाणी कमी पित असाल तर तुम्हाला लो बीपीची समस्या जाणवेल.

मुतखड्याचा त्रास शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे होते . खरं तर, जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा त्याचा किडनीच्या कार्यावर परिणाम होतो.

पाणी कमी प्यायल्याने तुम्हाला ड्राय माऊथची समस्या जाणवू शकते. तोंडामध्ये लाळेचे प्रमाण कमी होते. यामुळे बोलणे, गिळणे आणि श्वास घेणे देखील कठीण होऊ शकते. पाणी कमी प्यायल्यानं स्किन डल होते. चेहऱ्यावरील तेज निघून जाते. पाणी कमी प्यायल्यानं डोके दुखी, चक्कर येणे इत्यादी समस्या देखील तुम्हाला जाणवू शकतात. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे सांधेदुखी देखील होऊ शकते.

दररोज किती ग्लास पाणी प्यावे?

पाणी कमी पिणे टाळा आणि दिवसातून 8 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्ही निरोगी राहाल. कधीकधी लोकांना जास्त खातात पण पाणी कमी पितात. पण पाणी जास्त प्यायल्यानं शरीरातील फॅट्स देखील कमी होतात. त्यामुळे वेटलॉस ज्यांना करायचा आहे, त्यांनी दररोज जास्त पाणी प्यावे. तसेच पाणी योग्य प्रमाणात प्यायल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. पिंपल्स येणे, पित्त होणे इत्यादी समस्या पाणी योग्य प्रमाणात प्यायल्यानं जाणवत नाहीत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

इतर महत्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/n3K4S8s Tips : उभं राहून पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक? हे सत्य की असत्य?; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips: पाणी कमी प्यायल्याने होतात गंभीर आजार; दररोज किती ग्लास पाणी प्यावे? जाणून घ्या...https://ift.tt/t4aYDUB
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips: पाणी कमी प्यायल्याने होतात गंभीर आजार; दररोज किती ग्लास पाणी प्यावे? जाणून घ्या...https://ift.tt/t4aYDUB