Advertisement

<a href="https://ift.tt/oezIAQZ Advantages and Disadvantages : नवरात्रीची चाहुल लागली आहे. <a href="https://ift.tt/DSMOipe ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. हिंदू संस्कृतीनुसार, पवित्र दिवशी उपवास करण्याची पद्धत आहे. नवरात्रीमध्ये अनेक जण उपवास करतात. या उपवासाचं अध्यात्मिक महत्त्व तर, आहेच पण हे आरोग्यासाठीही फायदेशीर (Fasting Benefits) आहे. उपवास करण्यामागे अध्यात्मिक कारण आहे. त्यासोबतच यामुळे शरीर डिटॉक्स होण्यासही मदत होते. आता ते कसं ते सविस्तर जाणून घ्या.

उपवास करणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

आपल्या परंपरा अध्यात्म आणि वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित आहेत. उपवासामुळे शरीराला डिटॉक्स करण्याची संधी मिळते आणि पचनसंस्थाही मजबूत होते. शरीराला आराम आणि ऊर्जा देण्याचा हा एक उत्तम नैसर्गिक मार्ग आहे. त्यामुळे उपवास केल्याने शरीराला अनेक लाभ मिळतात.

शरीर डिटॉक्स होण्यास मदत

काही संशोधनांच्या मते, उपवास केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपवास अत्यंत फायदेशीर मानला जातो. उपवास केल्याने रक्तातील साखर नियंत्रित होऊन मधुमेहाचा धोका कमी होतो. याशिवाय ज्यांना लठ्ठपणाची समस्या आहे. त्यांच्यासाठीही उपवास खूप फायदेशीर आहे. उपवास केल्याने शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर पडून शरीर डिटॉक्स होते.

अधिक उत्साही, प्रसन्न वाटते

उपवास केल्यामुळे पचनसंस्थेला विश्रांती मिळते आणि ऊर्जेचा वापर कमी होतो. त्यामुळे शरीरात ऊर्जा जमा होते. उपवास केल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी कमी होते, त्यामुळे ऊर्जा पातळी वाढते. उपवासामुळे चयापचय क्रिया वाढते आणि हार्मोन्सचे प्रमाण संतुलित होते, ज्यामुळे ऊर्जा वाढते. उपवासामुळे रक्तातील साखरेची पातळी सुधारते, ज्यामुळे शरीराला अधिक ऊर्जा मिळते.परंतु उपवास करताना द्रवपदार्थ घेणे आवश्यक असते.

वजन कमी करण्यास मदत

वजन कमी करण्याचा उपवास हा एक प्रभावी आणि नैसर्गिक मार्ग आहे. उपवास वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. उपवासात कॅलरी कमी झाल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय उपवास केल्याने पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. पण, उपवासानंतरही संतुलित आहार घेणं आवश्यक आहे, नाहीतर वजन पुन्हा वाढू शकते.

हृदयविकारांसाठी उपयुक्त

उपवासामुळे ह्रदयविकाराचा धोका कमी होतो, असं एका संशोधनात समोर आलं आहे. जर्नल ऑफ सायन्स अँड सोसायटीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात, 110 लठ्ठ प्रौढांना 8 आठवडे दर तिसऱ्या दिवशी उपवास करण्यास सांगितलं गेलं. या अभ्यासात आढळलं की, संशोधनात सामील सर्व लोकांच्या खराब कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्समध्ये 25 टक्के घट दिसून आली. तसेच, उच्च रक्तदाबाची समस्या 32 टक्क्यांनी कमी झाली आणि हृदयविकाराचा धोका देखील कमी झाला.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/shuAHGt : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं संकट, 5 कोटी जणांचा मृत्यू होण्याची शक्यता; शास्त्रज्ञांचा दाव्यामुळे चिंता वाढली

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Navratri 2023 : नवरात्रीमध्ये उपवास करणं किती फायदेशीर? आरोग्यावर काय परिणाम होईल?https://ift.tt/t4aYDUB
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Navratri 2023 : नवरात्रीमध्ये उपवास करणं किती फायदेशीर? आरोग्यावर काय परिणाम होईल?https://ift.tt/t4aYDUB