Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०२३, ऑक्टोबर १३, २०२३ WIB
Last Updated 2023-10-13T01:50:21Z
careerLifeStyleResults
Health Tips : स्त्रियांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेची 'ही' आहेत लक्षणं; दुर्लक्ष केल्यास पडू शकतं महागात
Advertisement
Health Tips : प्रोटीन <a href="https://ift.tt/QwOX81S> शेक आणि प्रोटीनयुक्त आहार अशी गोष्ट आहे जी प्रत्येक स्त्री (Women) आपल्या मुलांसाठी तर आवर्जून करते पण यामध्ये ती स्वत: ला विसरून जाते. पुरुष, मुलांइतकीच आपल्यालाही प्रोटीनची गरज आहे याचा कोणत्या स्त्रीने विचार केला आहे का? प्रोटीन योग्य प्रमाणात घेऊन तुम्ही स्वतःची काळजी घेत आहात की नाही? बहुतेक स्त्रियांना स्वतःसाठी प्रोटीनच्या फायद्यांबद्दल माहिती नसते. खरंतर जोपर्यंत डॉक्टर आहारात बदल करण्यास सांगत नाहीत तोपर्यंत स्त्रिया स्वत:च्या आरोग्याके लक्ष देत नाहीत. स्त्रियांसाठी प्रोटीन किती गरजेचं आहे याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 
प्रोटीनच्या कमतरतेमुळे, महिलांना अशक्तपणा, थकवा किंवा स्नायू  यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. तर, प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्यास वजन वाढू शकते. याशिवाय किडनीशी संबंधित समस्या किंवा चिडचिड हे देखील प्रोटीनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. त्यामुळे आहारात पुरेशा प्रमाणात प्रोटीन घेतल्यास या समस्यांपासून आराम मिळतो.
महिलांसाठी प्रोटीनचे महत्त्व काय?
प्रथिने स्नायू तयार करण्याचे काम करतात.
शरीरात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन आणि रक्त प्रवाह पुरवतात
हार्मोन्सच्या पातळीकडे लक्ष 
पचनास मदत होते
पोट जास्त काळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
रोगप्रतिकारक शक्ती संतुलित ठेवते
यकृतामध्ये चरबी जमा होण्यापासून प्रतिबंधित करते
कोलेस्ट्रॉल कमी करते
नखे, केस, हाडे आणि त्वचा तयार होण्यास मदत होते
शरीरात प्रोटीनची कमतरता असण्याची लक्षणं :
पटकन थकवा येणे.
लवकर भूक लागते.
खूप मूडी असणे.
हात आणि पायांना सूज आहे.
वारंवार आजारी पडणे.
केस आणि नखे कमकुवत होणे.
कोरडी त्वचा होणे
महिलांनी प्रथिनांची कमतरता भासू नये म्हणून काय खावे?
अंडी आणि चिकन
हिरवे वाटाणे
दूध, चीज, दही
बदाम
पनीर
मसूर, राजमा
ब्रोकोली
ओट्स
एका सामान्य स्त्रीला दररोज किमान 50 ग्रॅम प्रोटीन आवश्यक असतात. प्रत्येक ग्रॅम प्रोटीन 4 कॅलरीज ऊर्जा निर्माण करतात. यासाठी प्रत्येक स्त्रीने प्रोटीन घेणं गरजेचं आहे असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/TU5imDa Care Tips : चेहऱ्यावरच्या ऑईली स्किनने हैराण आहात? मुलतानी मातीचा स्पेशल फेस पॅक आहे रामबाण उपाय; जाणून घ्या कसा बनवायचा
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : स्त्रियांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेची 'ही' आहेत लक्षणं; दुर्लक्ष केल्यास पडू शकतं महागातhttps://ift.tt/UcrOILX