Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०२३, ऑक्टोबर १३, २०२३ WIB
Last Updated 2023-10-13T03:49:45Z
careerLifeStyleResults
Kitchen Tips : फ्रीजमधून येणार्‍या वासामुळे घरातील वातावरण खराब झालंय? आजपासूनच 'या' किचन टिप्स फॉलो करा
Advertisement
Kitchen Tips : आजकाल जवळपास प्रत्येकाच्याच घरात फ्रीज असतं. या फ्रीजमध्ये आपण फळं, भाज्या काही वस्तू, पदार्थ साठवून ठेवतो जेणेकरून ते दीर्घकाळासाठी ताजं राहावेत. मात्र, अनेकदा या फ्रीजमधून काही पदार्थांमधून कुजलेला वास येतो. रेफ्रिजरेटर हा आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग आहे, उरलेले अन्न नेहमी ताजे ठेवण्याबरोबरच, ते आपल्याला भाज्या, फळे आणि इतर गोष्टी दीर्घकाळ साठवून ठेवण्यास देखील मदत करते. मात्र, या वासामुळे प्रत्येक स्त्री हैराण होते.
फ्रीजमधील दुर्गंधी दूर करण्याचे सोपे उपाय
हवाबंद कंटेनर वापरा
उरलेले अन्न हवाबंद डब्यात ठेवल्यास त्याचा वास फ्रीजमध्ये येत नाही, कारण काहीवेळा अन्नाच्या वासाने फ्रीजला दुर्गंधी येते. कोणत्याही खाद्यपदार्थाचा तीव्र आणि तिखट वास या डब्यात ठेवल्यास टाळता येतो.
फ्रीज उच्च तापमानात ठेवा
बेकिंग सोडा वापरा
रेफ्रिजरेटरमधून दुर्गंधी दूर करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे बेकिंग सोडा. तुम्हाला फक्त एक छोटीशी गोष्ट करायची आहे, फ्रिजमध्ये एक वाटी बेकिंग सोडा ठेवा. फ्रीजमधून येणारी सर्व दुर्गंधी यामुळे शोषून घेते.
लिंबू वापरा
लिंबू स्वयंपाकघरात अनेक प्रकारे वापरता येतो. रेफ्रिजरेटरमधून दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. एक लिंबू अर्धा कापून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. तुमच्या फ्रीजला काही वेळातच चांगला वास येऊ लागेल.
फ्रीजमधील भाज्या तपासत राहा
फ्रीजमध्ये जास्त सामान असल्याने आपण जुन्या भाज्यांकडे कमी लक्ष देतो. तुम्ही दर आठवड्याला फ्रीजमधून जुन्या आणि कुजलेल्या भाज्या आणि इतर वस्तू काढत राहा. यामुळे दुर्गंधी टाळता येते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/TU5imDa Care Tips : चेहऱ्यावरच्या ऑईली स्किनने हैराण आहात? मुलतानी मातीचा स्पेशल फेस पॅक आहे रामबाण उपाय; जाणून घ्या कसा बनवायचा
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Kitchen Tips : फ्रीजमधून येणार्‍या वासामुळे घरातील वातावरण खराब झालंय? आजपासूनच 'या' किचन टिप्स फॉलो कराhttps://ift.tt/UcrOILX