Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २० मार्च, २०२१, मार्च २०, २०२१ WIB
Last Updated 2021-03-20T13:47:29Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

नॅशनल हायवेज् ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये विविध विभागात भरती Rojgar News

Advertisement
Recruitment 2021: भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India किंवा NHAI) ने विविध विभागात मॅनेजर पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार, १२ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मसाठी एनएचएआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. उमेदवारांची भरती त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर होईल. पदांची माहिती NHAI द्वारा जारी करण्यात आलेल्या अधिकृत नोटिफिकेशन नुसार, या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून मॅनेजरची एकूण ४२ पदे भरण्यात येणार आहेत. यात डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स) ६ पदे, मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स) २४ पदे आणि डेप्युटी मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स) १२ पदांचा समावेश आहे. वेतन आणि वयोमर्यादा डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स) - पे-लेवल १२ नुसार, ७८,८०० रुपये ते २०९२०० रुपये पर्यंत वेतनानसह DA भत्त्याचा लाभ (वयोमर्यादा ५६ वर्षे) मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स) - पे-लेवल ११ नुसार, ६७७०० रुपये ते २०८७०० रुपये पर्यंत वेतनासह महागाई भत्ता (वयोमर्यादा ५६ वर्षे) डेप्युटी मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स) - पे-लेवल १० नुसार, ५६१०० रुपये ते १७७५०० रुपये पर्यंत (वयोमर्यादा ५६ वर्षे) पात्रता डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स) पदांसाठी उमेदवार वाणिज्य शाखेचे पदवीधर किंवा सीए किंवा फायनान्समध्ये एमबीए पदवी असणे अनिवार्य. मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स) पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार वाणिज्य शाखेचे पदवीधर किंवा सीए किंवा बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये एमबीए पदवी असणे अनिवार्य. डेप्युटी मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स) पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार वाणिज्य शाखेचे पदवीधर किंवा सीए किंवा फायनान्समध्ये एमबीए पदवी असणे अनिवार्य. शैक्षणिक पात्रतेविषयी संपूर्ण माहितीसाठी नोटिफिकेशन लिंक वर क्लिक करा. अर्ज कसा करायचा? इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. एनएचआयची अधिकृत वेबसाइट nhai.gov.in वर जाऊन अर्जाचं प्रिंट घेऊन नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्ट करायचे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3s6QRHV
via nmkadda