Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २१ मे, २०२१, मे २१, २०२१ WIB
Last Updated 2021-05-21T07:47:22Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Air India Jobs 2021: एयर इंडियात नोकरीची संधी; पगार ५० हजारांपर्यंत Rojgar News

Advertisement
Air India Vacancy 2021: जर तुम्हाला अकाउंट्स आणि फायनान्सची शैक्षणिक पार्श्वभूमी असेल तर तुमच्याकडे केंद्र सरकारची एव्हिएशन कंपनी एअर इंडियामध्ये (Air India) नोकरी मिळवण्याची संधी आहे. एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेसने विविध पदांवर भरती सुरू केली आहे. जर तुमची निवड झाली तर तुम्हाला देशातील मेट्रो शहरे दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai), चेन्नई (Chennai) किंवा कोलकाता (Kolkata) मध्ये पोस्टिंग मिळेल. पगार देखील आकर्षक असेल. या भरतीचा तपशील, नोटिफिकेशन आणि ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या लिंक्स या वृत्तात पुढे देण्यात येत आहेत. पदांची माहिती मॅनेजर (फायनान्स) - ४ पदे ऑफिसर (अकाउंट्स) - ७ पद असिस्टंट (अकाउंट्स) - ४ पदे एकूण पदांची संख्या - १५ पदे पे-स्केल (Basic Pay) मॅनेजर - ५० हजार रुपये मासिक ऑफिसर - ३२,२०० रुपये मासिक असिस्टंट - २१,३०० रुपये मासिक पात्रता काय सामान्य ग्रॅज्युएट (फायनान्स किंवा अकाउंट्समध्ये किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक) ते एमबीए, सीए इंटर आणि चार्टर्ड अकाउंटंट पर्यंत शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता ते नोटिफिकेशन मध्ये दिले आहे. कसा करायचा अर्ज? या जॉबसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अॅप्लिकेशन फॉर्म नोटिफिकेशन लिंकमधून डाऊनलोड करा. प्रिंटआऊट काढा. ते भरून सॉफ्टकॉपी एअर इंडियाच्या ईमेल आयडी hrhq.aiasl@airindia.in वर पाठवा. ई-मेल अॅप्लिकेशन फॉर्मसह सर्व महत्त्वाची कागदपत्रे अटॅच करा. अर्जांसाठी कोणतेही शुल्क नाही. अर्ज करण्याची अंतिम मुदत १ जून २०२१ आहे. निवड प्रक्रिया एयर इंडियाच्या या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. तुमच्याद्वारे जमा केलेले अर्ज स्क्रीनिंग करून आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/345pyDf
via nmkadda