Board Exams 2021: बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत Rojgar News

Board Exams 2021: बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत Rojgar News

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी रविवारी सांगितले की बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी राज्यांमध्ये व्यापक सहमती आहे आणि यासंबंधी १ जूनपर्यंत एक सामूहिक निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्र सरकारने या बैठकीत बारावीसाठी परीक्षेव्यतिरिक्त कोणता मार्ग आहे का ते पाहण्याची सूचना केली तर दिल्ली आणि केरळने परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याच्या सूचनेवर भर दिला. सीबीएसईने परीक्षा १५ जुलै ते २६ ऑगस्ट दरम्यान परीक्षा घेऊन सप्टेंबरमध्ये निकाल जारी करण्याचा प्रस्ताव ठेवला. सीबीएसई बोर्डाने दोन पर्याय सुचवले. यापैकी एक म्हणजे केवळ १९ प्रमुख विषयांची नियमित परीक्षा घ्यावी किंवा बोर्डाशी संलग्न शाळांमध्ये कमी कालावधीची परीक्षा घ्यावी. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी या दोन्ही पर्यायांबाबत राज्यांची मते २५ मे पर्यंत विस्तृतपणे मागवली आहेत. कोविड-१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे सीबीएसई बारावी लांबणीवर टाकण्यात आली आहे आणि दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १४ एप्रिल रोजी हा निर्णय झाला. या परीक्षा ४ मे ते १४ जून २०२१ या कालावधीत होणार होत्या. परिणामी, राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) आणि अन्य राष्ट्रीय परीक्षा आयोजित करण्याऱ्या संस्थांनी देखील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षा स्थगित केल्या. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेसाठी ही डिजिटल माध्यमातून झालेली बैठक सुमारे दोन तास सुरू होती. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांच्यासह केंद्रीय मंत्री स्मृति इराणी, प्रकाश जावड़ेकर, शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासह राज्य आणि केंद्र शासित प्रदेशामधील शिक्षणमंत्री आणि सचिव या बैठकीस उपस्थित होते. बैठकीनंतर पोखरियाल यांनी ट्विट करून हे सांगितले की या बैठकीतून खूप मौल्यवान सूचना, शिफारशी प्राप्त झाल्या. शिक्षण मंत्रालयानुसार, २५ मे पर्यंत राज्यांकडून बोर्ड परीक्षांसंबंधीच्या विस्तृत सूचना येतील, त्याचे परीक्षण करून केंद्र सरकार १ जून २०२१ किंवा त्यापूर्वी परीक्षेसंबंधीचा निर्णय जाहीर करेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wrfeBK
via nmkadda

0 Response to "Board Exams 2021: बारावी बोर्ड परीक्षांसंबंधी निर्णय १ जूनपर्यंत Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel