Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २५ मे, २०२१, मे २५, २०२१ WIB
Last Updated 2021-05-25T04:47:23Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

दहावीचे विद्यार्थी तणावात; संस्थाचालकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कशा पद्धतीने करणार, याबाबतचा अंतिम निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. विद्यार्थी, पालक यांच्यावर करिअरचा येणारा ताण लक्षात घेता राज्य सरकारने तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती पालक आणि संस्थाचालक करत आहेत. नेमके काय होणार याबाबत विद्यार्थी खूप तणावात असल्याचे संस्थाचालकांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. मूल्यांकन प्रक्रिया वेळेत ठरवावी, या मुद्द्याकडे लक्ष वेधत मराठी संस्थाचालक संस्थेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. सध्या १०वीचे मूल्यांकन कसे होणार हे ठरत नाही तर अकरावीसाठी प्रवेश परीक्षा होणार का, याबाबतही अंतिम निर्णय झालेला नाही. ही अनिश्चितता विद्यार्थ्यांना मानसिकरित्या पूर्णत: मोडून टाकेल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. १०वीच्या मूल्यांकनाचा तिढा सुटण्यापूर्वीच शहरात ११वीच्या शिकवण्या सुरू झाल्या आहेत. याबाबतचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केले. यानंतर पालकांनी याबाबत व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. १२नंतरच्या उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या प्रवेशपरीक्षा केंद्रीय स्तरावरून होतात. त्या नियोजित वेळेतच होतील. यामुळे ११वीचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण झाला नाही, तर १२वीचा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना सराव परीक्षांची तयारी करण्यासाठी वेळ कसा मिळणार, असा प्रश्न पालकांसमोर आहे. यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या शिकवण्यांचा पर्याय स्वीकारून विद्यार्थ्यांच्या विचार करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अजून १०वीच्या निकालाचीच बाब तडीस नेण्यात शिक्षण विभाग दारोदार भटकत असताना प्रवेशाचे गणित कसे जुळवणार हे तज्ज्ञांनाही सांगता येत नाही. ११वी, १२वीला विज्ञान घेऊन दोन वर्षांनंतर दिल्या जाणाऱ्या प्रवेशपरीक्षा मात्र ठरल्या वेळी होतील. त्यामुळे अभ्यासाचा कालावधी कमी मिळून तो पूर्ण होणे कदापि अशक्य ठरेल, अशी भावना पालक व्यक्त करत आहेत. ज्युनिअर कॉलेज व क्लास एकात्मिक असो किंवा नसो पण 'नीट' आणि 'जेईई' परीक्षांना सामोरे जावे लागते. त्याची तयारी दोन वर्षे व्यवस्थितपणे झाल्यानंतरच विद्यार्थी त्यात सरस ठरू शकतात. यामुळे अनेक पालक इच्छा नसतानाही सामाजिक ताणाखाली शिकवणी वर्गांचे पर्याय स्वीकारत आहेत. कठीण निर्णय घेण्याची वेळ यंदाचा ११वी प्रवेशाच्या तिढा काहीतरी मार्गाने सुटेलच, मात्र कायमाचा हा प्रश्न सोडवायचा असल्यास बुद्धिनिष्ठ विचार व तर्कशास्त्र यावर आधारित कठीण निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे संस्थाचालक संस्थेचे समन्वयक सुशील शेजूक आणि संस्थापक सदस्य व मार्गदर्शक सुरेंद्र दिघे यांनी या पत्रात नमूद केले आहे. पुढचे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांचे लसीकरण युद्धपातळीवर होण्यासाठी नियोजन करण्याची विनंतीही या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fMpBcA
via nmkadda